प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहोळा अकोला येथे संपन्नकाल दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सोहोळा अकोला येथे अकोला जिल्हा काँग्रेस कार्यालय “स्वराज्य भवन” येथे संपन्न झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यभरातून मोठया संख्येने सर्व स्तरावरील शिक्षक आले होते.या पुरस्कार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. धीरज भाऊ लिंगाडे व अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. किरण भाऊ सरनाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे उपस्थित होते. “शिक्षक हा स्वतःअनेक गुणांनी संपन्न असतो. विद्यार्थ्यांना शिकवीत असता तो परिसरातील वातावरणाशी एकरूप होतो , ते अंगिकरतो व त्याच्या योग्य उपयोग आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुंनाना वाव देण्यासाठी व स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी करून घेत असतो. अशी अनेक नवनवीन क्षेत्रे आहेत तिथे शिक्षक हा स्वतःस वाहून घेतो व एक नवीन कलाकृती जगासमोर आणत असतो..अश्या होतकरू व आदर्श शिक्षकांच्या अंगी असलेल्या कला गुणाना शाबासकी देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करीत असते ” असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणातून केले व प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग हा महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व न्याय्यमागण्यांसाठी नेहमी त्यांच्या पाठीशी असतो असेही प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमास मा. आमदार धीरज भाऊ लिंगाडे मा.आमदर किरण भाऊ सरनाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले व त्यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे आपल्या भाषणातून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश काँग्रेस सचिव व शिक्षक विभाग राज्य मुख्य कार्याध्यक्ष प्रकाश तायडे यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून उपस्थितांचे आभार मानलेत. कार्यक्रमास अकोला शहर काँग्रेस चे शहर अध्यक्ष डॉ. पाटील, ग्रामीण अध्यक्ष श्री. अशोकराव, राज्य शिक्षक विभागाचे उपाध्यक्ष श्री. वाहुर वाघ सर, श्री.अमर पाटील इतर अनेक प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या कुटुंबातील व्यक्तीस आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तो आनंदाचा व कौतुकाचा सोहोळा पाहण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
छ.संभाजी नगर…….बीड येथील माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे लातूर येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि बीड येथील प्राथमिक…