वर्दीतल्या भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकासह तिघे जाळ्यात…! तीन लाखांची लाच भोवली..!

जळगाव क्राईम न्यूज ब्युरो:- लाच मागणे गुन्हा आहे.लाच देणे गुन्हा आहे.मात्र हे असतांना देखील काही अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य माणसांकडून लाचेची मागणी करुन जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक दिवस त्याचा घडा भरतो.अशिच एक घटना घडली, भुसावळ येथील बायोडिझेलच्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच मंगळवारी सायंकाळी अटक केली.धुळे एसीबीच्या या कारवाईने पोलीस वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

आता लाच मागणारा अडुनच बसला तेव्हा,तडजोडी अंती त्याने स्वीकारली तीन लाखांची
लाच.

घडलं असं की,एका प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागून तीन लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहाय्यक निरीक्षक सांगळे यांच्यासाठी खाजगी हस्तक ऋषी शुक्ला व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचा रायटर तुषार पाटील यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. बोदवड तालुक्यातील मनुर फाट्याजवळ ऋषी शुक्ला यास लाच घेताना पकडण्यात आले व नंतर पोलीस निरीक्षकांचा लाच प्रकरणात सहभाग स्पष्ट होताच त्यांनाही अटक करण्यात आली,

असे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले. आता मासा जाळ्यात कसा अडकेल??याचे झाले नियोजन..

यांनी केला सापळा यशस्वी हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला,

हवालदार चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
या सापळ्यात बडा अधिकारी अडकल्याने कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे ✍️✍️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *