शाकुंतल वाचनालय तर्फे विद्यार्थ्यांना गोष्ठीची पुस्तकें भेट

धुळे…प्रतिनीधी …. समाज घडवायचा असेल तर वाचनालयांची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील नागरिकांनी वाचन हे केलेच पाहिजे. वाचनातून विविध ज्ञान आपल्याला प्राप्त होते. म्हणून वाचन संकल्प आपण केला पाहिजे. यासाठी शासनाने वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमातुन शाकुंतल सद्ग्रंथ वाचनालय खर्देबु। दोंडाईचा ता शिंदखेडा जि धुळे द्वारे जि.प.मराठी शाळा अंजनविहरे येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री सुरेश मोरे यांनी मुलांना गोष्टीचे पुस्तकें भेट दिली.चला वाचन करू या असा हा मुलमंत्र देऊन वाचनाचे महत्व सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ठाकुर सर व उपशिक्षक ईश्वर ढिवरे ढिवरे मॅडम यांनी ही वाचनाचे महत्व विषद केले.मोबाइल पासुन दुर राहुन वाचनाची आवड वाढवावी असा दृढ निश्चय दिला या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी दिव्या कैलास पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना चाकलेट वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयात भेट देण्यास आमंत्रित केले. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे ज्ञान वाचन हे केले पाहिजे असा आग्रह धरण्यात आला. सध्या घराघरात व घरातील प्रत्येक माणसांकडे मुलांकडे मोबाईल हे तंत्रज्ञान हाती लागलेले असल्याने जो तो वाचन संस्कृती विसरून या मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. यातून विद्यार्थ्यांचे संस्कार देखील बिघडत आहेत. अशा परिस्थितीत आपण वाचनाची पुस्तके जर पालकांनीच हाती घेतले आणि त्यांनी स्वतः वाचन केले तर आपल्या लहान बालकांना त्याची देखील सवय लागेल आणि ते देखील पुस्तके वाचण्यासाठी प्रयत्न करतील त्यातून त्यांना संस्कार मिळतील डोळे खराब होण्यापासून परावृत्त होतील मोबाईल मधून अल्ट्राव्हायलेट सारखी भयानक किरणे बाहेर पडतात व त्यातून डोळे खराब होतात म्हणून वाचन संस्कृतीच खरी महत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *