हर घर तिरंगा,हर घर स्वच्छता मोहीमेअंतर्गत ग्रामपंचायत रानमळा ता जि धुळे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. धुळे…आज शासनाच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालये व सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ११आँगष्ट २०२५ हा दिवस हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता मोहिमे अंतर्गत, संपूर्ण ग्रामपंचायत रानमळा ता जि धुळे येथील कर्मचारी, यांच्या वतीने हा स्वच्छता अभियान उपक्रम ग्रामपंचायत रानमळा ता जि धुळे येथील माजी लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण ईश्वर पवार यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी ग्रामरोजगार सेवक श्री रविंद्र मारोती माळशिकारे,कर्मचारी श्री तिरसिंग शिवाजी सोनवणे, ग्रामपंचायत केंद्र चालक श्री चेतन हरिश्चंद्र गायकवाड यांनी रानमळा गावातील ग्रामपंचायत परिसर मध्ये स्वच्छता करून स्वच्छतेबाबत सर्व ग्रामस्थांना महत्त्व पटवून देण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारींनी स्वच्छ सुजलगाव प्रतिज्ञा सामूहिक रित्या घेऊन या अभियानाची सुरुवात केली. यावेळी सर्वत्र पसरलेले प्लास्टिक, घाण व कचरा संकलन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.