

नाशिक …….(सा पोलीस व्हिजन, क्राईम न्यूज ब्युरो धुळे)- संपूर्ण महाराष्ट्रात त नव्हे तर संपूर्ण देशात गाजणारा नासिक येथील लिंग पिसाट कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षा या उच्च पदावर असलेल्या रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणातून हे प्रकरण किती मोठे आहे याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे…संपूर्ण राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडवून देणारे व अंध महिला भक्त जनतेला हादरून सोडणारे नाशिकच्या लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरातचे ‘बिंग’ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलानेच फोडले हे त्रिवार सत्य आता लपून राहिले नाही.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे या दोन ‘सोमनाथांनी’ शिर्डीतील दाखल गुन्ह्यावरून ही समाजाला हादरून सोडणारे भोंदू कॅप्टन अशोक खरातचे लिंगपिसाट रूप समोर आणले त्यांना डीवायएसपी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे या शिर्डीतील पोलीसांची तत्परता कामी आली. थोडक्यात असे की, १८ फेब्रुवारीला शिर्डी परिसरातील एक सधन घरच्या २४ वर्ष तरुणीने नाशिकच्या आरोपी निरज जाधव नावाच्या तरुणाविरुद्ध अश्लील फोटो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा एसपी.सोमनाथ घार्गे व सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती व पोनि.गलांडे यांनी तपास केला असता आरोपी नाशिकचा बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात कामाला असल्याचे समजले पोलीसांनी कोणताही वेळ न घालवता थेट आरोपी निरज जाधव या तरुणाला पकडले. त्याला विश्वासात घेतले असता त्याच्या जवळून पेनड्राईव्ह मिळाला तो तांत्रिक दृष्टया तपासला असता पोलीसांना लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरात याचे खरे रूप समोर आले. मग काय ह्या कॅप्टन खरातच्या अश्लील व्हीडीओने अनेक वेगवेगळ्या महिला, आजी-माजी मंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा या सर्वाचेच फोटो चर्चेत आले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात व अंध महिला भक्तांमध्ये खळबळ उडाली.
ऐवढ्या मोठ्या ‘सेक्स बॉम्ब’ ला उघड करणाऱ्या अहिल्यानगर पोलीसांची राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठ थोपटली असणारच. कारण धार्मिक व जोतिष चेहऱ्याच्या आडून भोंदू लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरातचे बिंग फुटले.
ज्यावेळेला जिल्हयात गेल्यावर्षी एसपी म्हणून सोमनाथ घार्गे व अप्पर अधिक्षक म्हणून सोमनाथ वाकचौरे यांनी पदभार स्विकारला तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतुक होत होते.कारण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्रीक्षेत्र नाशिक येथे पुढच्या वर्षी हिंदूंचा महाकुंभमेळा होत आहे आणि नाशिक मधील भोंदू लिंगपिसाट कॅप्टन खरात याचे मायाजाळ व अफाट सप्पत्ती मोठे लफडे उघड झाले.दरम्यान १ वर्षापूर्वी पत्रकार खेमनर यांनी बातमी छापल्याने रूपाली व कॅप्टनने त्यांना नोटीस व धमकी दिली होती.यातुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला होता.मात्र गुन्हेगार हा शेवटी केव्हा तरी मोठी चूक पुन्हा करतोच आणि ते बिंग फुटले आणि एकच खळबळ उडाली आहे.एस आय टी च्या चौकशी सुरू झाली असून अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी मोठे मासे सापडतात की काय या कडे लक्ष आहे.

