
🔴 शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई!
माजी शिक्षण उपसंचालक अटकेत!
नाशिक..(सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो).शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी महाघोटाळ्यात शेवटी एक मोठे नाव पोलिसांच्या ताब्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बँक डेटेड तारखेला कर्मचारी दाखवून त्यांना बोगस शालार्थ आयडी देऊन कोट्यावधींचे शासनाचा निधी हडप करण्याचे तपासात उघडकीस आले असल्याचे बोलले जात आहे.काही संस्थामध्ये सन 2013 पासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बंद असल्यावरही आपल्या जवळच्या नातेवाईकांना, काही संघटना प्रमुखांनी आपली दडपशाही मार्गाने आपल्या मुलांना प्रथम लिपीक नंतर ते काँलीफाईड म्हणजे बि ए बि एड असल्यामुळे पदोन्नती ने शिक्षक करण्याचे देखील प्रकरणे असल्याची बोलले जात आहे कसुन चौकशी केल्यावर नक्कीच अनेक धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक,अहिल्या नगर व इतर जिल्ह्यांत ही बोगस शिक्षक पदभरती ची प्रकरणे उघडकीस येतील अशी कुजबूज सुरू आहे.ज्या शिक्षक उपसंचालक उपासणी यांनी आयुष्यभर इतरांच्या फाईल्सवर लाल शाईचे शेर मारणारे माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आता स्वतःच ‘आरोपी’ म्हणून अडकले आहेत.
👮♂️ नाशिक पोलिसांच्या तपासात उघड झाले की,
कागदपत्रे व माहितीच्या गुंत्यातून शोध घेताना अधिकारी उपासनी यांच्यापर्यंत घोटाळ्याचे धागेदोरे पोहोचले. लाखो रुपयांच्या अपहारात शालार्थ आयडी बनवण्याचा गंभीर आरोप त्यांच्या नावावर आहे.
📌 यापूर्वीही अनेक जणांना अटक
उदय पंढरी आणि राजमोहन शर्मा यांनाही अटक झाली होती. पण मुळापर्यंत जाणारे धागे आता अधिक स्पष्ट झाले आहेत.
⚖️ सेवानिवृत्तीनंतरही कायद्याचे हात लांब!
उपासनी यांना अटक होताच, या प्रकरणातील अनेक ‘बडे मासे’ अजूनही रडारवर असल्याची चर्चा तापली आहे. उद्या न्यायालयात त्यांना हजर केले जाणार असून पोलिस कोठडीतून कोणती माहिती बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेक संधी साधुंची मात्र झोप उडाली आहे हे निश्चित आहे.एक दिवस नक्कीच असा येणार की अनेक या प्रकरणात सहभागी असतील त्यांच्या पर्यंत पोलिस पोहोचतील.असे ही सुत्रांकडून समजते.
🔍 वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेखके यांच्या नेतृत्वाखालील पथक काटेकोर तपास करत असून—
“हा घोटाळा मुळाशी जाऊन पूर्णपणे उखडून काढू,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नाशिक पोलीसांच्या कामगिरी ला सलाम. बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन…. नाशिक क्राईम न्यूज ब्युरो…

