दहावी मराठी विषयातील ‘निर्णय’ पाठाचे लेखक डॉ. सुनिल विभुते लेखक ‘शाळा आपल्या भेटीला’… उपक्रमांतर्गत ऑनलाईन पाठाचे विवेचन

विखरण – नंदुरबार तालुक्यातील श्री.धंगाई विधायक कार्य मंडळाचे, श्री.आप्पासो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे इ.दहावी मराठी पाठ्य पुस्तकातील “निर्णय” या पाठाचे लेखक डॉ.सुनील शिवप्रसाद विभुते यांचे ऑनलाईन पाठाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. डॉ.विभुते यांनी विद्यार्थ्यांना “निर्णय” कथा लिहिण्यामागील प्रेरणा सांगितली.कथा लिहिण्याची पार्श्वभूमी,कथेचं लेखन का सुचलं ? कथा लेखनाला सहा महिने कालावधी लागला.अनुभव कथन विद्यार्थ्यांना केले.विद्यालयातील विद्यार्थ्यी देवर्षी पाटील,कृष्णा पाटील,सुवर्णा पाटील,भावेश पानपाटील,दीपेश लोहार आदींनी मराठी विषय व पाठा विषयी शंका,प्रश्न विचारून पाठाचे आकलन करून घेतले. शंका समाधाना सोबतच विविध शास्त्रज्ञांच्या जीवनातील प्रसंग कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनाद्वारे डॉ.विभुते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत केला. जिज्ञासा काय असते? तिच्यामुळे शोध लागतात हे सांगितले.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?याचे विवेचन केले. विज्ञानामुळे मानवी जीवन सुखी समाधानी झाले आहे.शास्त्रज्ञ हेच खरे देव आहेत.त्यांच्यामुळे आपल्या जीवनातील सेवा वेगवान झाल्या आहेत. प्रास्ताविकासह लेखक परीचय विषय शिक्षक,मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही.नांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.बी.भारती यांनी मानले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी एम.डी.नेरकर,वाय.डी.बागुल, एस.एच.गायकवाड,डी.बी.
पाटील,एस.जी.पाटील,एच.एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.