धुळे मोहाडी उपनगर पोलिस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या पाऊल वाटा पुस्तकाचे ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय मध्ये वाटप व सुरक्षे संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्यात आली. रानमळा…(धुळे..सा पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)… धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आधुनिक जगातील मुलांचे एक सुरक्षित पाऊल यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षेच्या पाऊलवाटा या पुस्तिकेचे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वतीने पुस्तकाचे प्रकाशन करून ग्रामीण व शहरी भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक सुंदर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलेले आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात खाकी वर्दीतील पोलिसांनी प्रत्यक्ष भेटून दिली आहे याचे सर्वत्र स्वागत होत आहे. याबाबत आपल्या धुळे जिल्ह्याचे सक्षम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से) यांनी आपल्या मनोगतात आजच्या डिजिटल व आधुनिक युगात बालकांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे बालकांचे स्वसंरक्षण विधी संघर्ष ग्रस्त बालकांचे समुपदेशन ट्रॅफिक नियम सायबर सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांकरिता मूलभूत मार्गदर्शनाकरिता हे पुस्तक उपयुक्त ठरेल आजच्या युगात स्वतःचे संरक्षण करण्याची जाणीव निर्माण करणे आणि त्यासाठी सक्षम करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे असे आपल्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटले आहे. सुरक्षेच्या पाऊलवाटा या पुस्तकाच्या संपूर्ण माहितीचे संकलन व सहकार्य सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश सतीश काळे, मानव संसाधन शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांनी केले आहे. आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे तालुक्यातील रानमळा येथील एकनाथ महाराज हायस्कूल येथे हा कार्यक्रम राबविण्यात आला.सदर कार्यक्रम माननीय धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाने व माननीय अप्पर पोलिस अधीक्षक श्री अजय देवरे, माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी,श्री राजकुमार उपासे, यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी उपनगर पोलिस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील मंँडम यांनी आपल्या पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेश चव्हाण, पोलिस काँन्स्टेबल मयुर गुरव यांनी प्रत्यक्ष एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील विद्यार्थी विद्यार्थीनींना सुरक्षा बाबत व सुरक्षेच्या पाऊल वाटा या पुस्तकात विविध सतर्कता बाबत माहिती दिली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब के. पी. पाटील यांनी विद्यार्थी सुरक्षा बाबत महत्त्वपूर्ण भाषण केले. व पोलीस दलाने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा कारणास्तव ही मोहिम सुरू केली म्हणून आभार व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांना मोहाडी उपनगर पोलिस स्टेशन च्या पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी आपल्या मनोगतात धुळे जिल्हा पोलीस दलातील मुलांसाठी चे विविध उपक्रम बाल संरक्षण मूलभूत मार्गदर्शन तत्वे पोक्सो कायदा बाल लैंगिक शोषणाविरोधात कठोर पाऊल सायबर सुरक्षा सोपे मार्गदर्शन वाहतूक नियमांचे महत्त्व तसेच मुलांचा मानसिक छळ परिणाम व उपाय मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्व , महिला व मुलांविषयी अत्याचार प्रतिबंधक महत्वाचे कायदे व इतर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्यात.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे उपशिक्षक श्री सी एस भदाणे सर यांनी केले.अधिकारींचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब के पी पाटील,श्री पी जी साळुंके,श्री एस आर सूर्यवंशी यांनी केले आभार प्रदर्शन श्री प्रल्हाद साळुंके यांनी मानले.या वेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री एन पी पवार सर, सौ.व्हि.जी.पाटील मंँडम,एस एस पावरा सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले. सदर पुस्तक लिंक दिली आहे क्लिक करा व पुस्तक वाचा https://qr.me-qr.com/mobile/pdf/128923db-d85f-4339-b8c6-03355ef6a40b. सा पोलिस व्हिजन धुळे
Related Posts
शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील प्राचार्यांच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांचे तीव्र निषेध आंदोलन
धुळे | दि. २२ डिसेंबर २०२५ सा पोलीस व्हिजन धुळे….शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथील प्राचार्य डॉ. राजू वाडेकर यांच्या कार्यालयीन कामकाजाची…
एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा येथील दोन दिवसांची शैक्षणिक सहल संपन्न
*एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा येथील दोन दिवसांची शैक्षणिक सहल संपन्न* 💐💐💐🌷🌷🌷🌺🌺🌺*एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे ची दोन दिवसाची…
जिल्हा परिषद शाळा गुजर जांभोली येथे सहावी शिक्षण परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न
नंदुरबार.. शिक्षणाचा वसा कायम सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र…
