एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा येथील दोन दिवसांची शैक्षणिक सहल संपन्न

*एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा येथील दोन दिवसांची शैक्षणिक सहल संपन्न*

💐💐💐🌷🌷🌷🌺🌺🌺
*एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे ची दोन दिवसाची शैक्षणिक सहल उत्तम अशी संपन्न *

धुळे ….. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे मोठ्या शहरांचा नजारा काय असतो हे त्यांना ठाऊक नसते. कारण असते त्यांचे आई-वडील हे साधारण शेतकरी वर्ग असतो सामान्य कष्टकरी कामगारांची मुलं ही ग्रामीण भागातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये असो किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये आपले शिक्षण घेत असतात. परंतु त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे क्वचितच मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा लाभ मिळत असतो त्यामुळे त्यांना शहरी जीवन काय असते शहरातील धकाधकी काय असते आपल्याला आवश्यक असणारे शासकीय कार्यालय कसे व कुठे असतात शहरातील रोजच्या दळणवळणाच्या नित्यनिमाच्या घटना त्यांना माहिती नसतात याच कारणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहल हे एकमेव पर्याय उरलेला असतो तो म्हणजे शैक्षणिक सहलींना जाऊन त्या विविध शहरांचा व त्यामध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन ते प्रत्यक्ष पाहून आनंद घेता यावा तसेच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आलेले मोठ्या शहरांची नावे व त्यात भौगोलिक ऐतिहासिक वास्तूंचा प्रत्यक्ष उदाहरणासह उल्लेख तो प्रत्यक्ष त्या सहलींच्या माध्यमातूनच त्यांना तो अभ्यासता येतो म्हणून शासनाने शैक्षणिक सहल ही शैक्षणिक बाबींमध्ये आवश्यक जरी ठरवलेली असली तरी या सहलीकरिता इतके कठोर नियम व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शालेय व्यवस्थापनाला बंधनकारक केले असल्यामुळे नको ती सहलीची झणझट म्हणून अनेक शाळा या शैक्षणिक सलीन पासून लांबच राहतात. वास्तविक शासनाने या सहलींना कवच द्यायला पाहिजे. प्रोत्साहन द्यायला पाहिजे. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून बाहेरील जीवनाचा प्रत्यक्ष प्रवास कसा असतो त्यातून त्यांना पुढील जीवनात नोकरी निमित्ताने जाताना अडचणी निर्माण होणार नाहीत त्यांना प्रत्यक्ष अनुभव निर्माण होईल याचे गंभीर्य ठेवून या सहलींना सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये परवानगी देऊन शासकीय यंत्रणे माध्यमातून सुरक्षा घेत जे सहलीसाठी निर्बंध लावलेले आहेत ते कमी करून विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे त्यांचा तो एक अभ्यास दौराच आहे असे समजून सहलीसाठी अशा शाळांना वेठीस न धरता सहली काढल्या जातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अपघात ही तांत्रिक बाब असते आणि ती कधीतरी अशा घटना होतच राहत असतात. म्हणून शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरणे योग्य नाही शिक्षकांना जबाबदार धरणे योग्य नाही यासाठी शासनाने काहीतरी ठोस प्रयत्न करून अशा सहलींना मुख्याध्यापक शिक्षक यांना संरक्षण देऊन अपघात घडल्यावर त्यांना दोषी न धरता या मागील तांत्रिक कारण समजून त्यांना उलट मदत केली पाहिजे कायद्याच्या दृष्टीतून हे योग्य पाऊल त्यांनी उचलले पाहिजे अशी अपेक्षा शालेय विद्यार्थी व व्यवस्थापनाकडून होत आहे. अशाच पद्धतीने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेची दोन दिवसीय शैक्षणिक सहल संपन्न झाली. यात रानमळा ते मुंबई दर्शन,जे मुंबई शहरात विद्यार्थी विद्यार्थीनींना शैक्षणिक ऐतिहासिक माहिती चा अभ्यास व्हावा यासाठी गेट वे आँफ इंडिया, नरिमन पॉइंट, विज्ञान भवन, नेहरू तारांगण,राणीचा बाग,मुंबई समुद्रातुन जाणारा कोस्टल रोड,बुट हाउस, हाजी अली,विविध हिंदी फिल्म सिनेतारा यांचे बंगले, सिध्दीविनायक गणपती मुंबई,ज्युहु चौपाटी,दादर,वसयी वज्रेश्वरी देवीचे दर्शन, नित्यानंद स्वामी समाधी स्थळ येथील नैसर्गिक गरम पाणी चे कुंड स्नान,वाडा, त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, नाशिक पंचवटी गोदावरी घाट असा शैक्षणिक सहल प्रवास करत ही एकुण दोन दिवसांची सहल दिनांक 23-12-2025 ते दिनांक.24-12-2025 पर्यंत यशस्वी संपन्न झाली.एकुण मुलं मुली मिळुन 86 विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला,सोबत आठ शिक्षक कर्मचारी यांनी सहलीचे नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य केले.सहल शासकीय सर्व नियम धरुन एस टी महामंडळ बस एकुण दोन घेउन त्याने प्रवास केला.शासन प्रतिनिधी माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या पुर्व परवानगी ने ही सहल उत्तम अशी संपन्न केली.याची संपूर्ण माहिती पालकांना पालक शिक्षक सभा बोलावून आधीच देण्यात आली होती त्यांचे समंती पत्र देखील घेण्यात आली होती.सहल यशस्वी करण्यासाठी सन्माननीय अध्यक्षा ताईसाहेब डॉ शालिनीताई बोरसे, सेक्रेटरी सन्माननीय डॉ दादासाहेब अभय बोरसे, संस्था ओ एस सन्माननीय डॉ तात्यासाहेब बी एम पाटील यांचे व रानमळा गावातील जेष्ठ प्रतिष्ठित पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन घेऊन सदर सहलीसाठी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक बापूसाहेब,के पी पाटील सर, जेष्ठ शिक्षक श्री पी.जी.साळुंखे सर, श्री एस.आर.सूर्यवंशी सर,सहकारी शिक्षिका श्रीमती व्ही.जी.पाटील मॅडम,सहल प्रमुख श्री सि एस.भदाणे सर यांनी नियोजन केले होते,शिक्षक श्री पावरा सर,श्री.नित्यानंद पवार सर, श्री.सुभाष शिंदे, यांनी गेल्या दहा दिवसांपासून सहलीची संपूर्ण तयारी साठी मेहनत घेतली आहे.त्यातुनच ही सहल यशस्वी संपन्न झाल्याचे मत आहे.सर्वींनी मदत केल्याबद्दल सर्वांचे
आभार,आभार,आभार,,,🙏🙏🙏 एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे प्रशासन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5101852, 0.6041667);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5101852, 0.6041667);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 37;