धुळे..(दोंडाईचा)…सा पोलीस व्हिजन क्राइम न्युज ब्युरो…. शासकीय वर्दी असली की काहींना त्या वर्दीचा माज चाललेला वास्तविक सामान्य नागरिकांची सुरक्षेची व्यवस्था या वर्दी मधील पोलिसातील माणसाला दिलेला हक्क आहे. मात्र त्या वर्दीचा गैरवापर आपल्या स्वतःच्या घर भरण्यासाठी काही ठराविक पोलीस अधिकारी करतात असा एक प्रकार धुळे आणि गणेश शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले.येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरातून 60 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने झडतीमध्ये आढळून आली. याशिवाय 77 हजार रुपये किमतीची चांदीची भांडी व दागिने, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे एक कोटी 75 लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्तऐवज देखील आढळून आले आहेत. एकूण दोन कोटी पस्तीस लाख 77 हजारांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार नितीन मोहने आणि पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्याविरुद्ध 1 एप्रिल रोजी सापळा कारवाई होऊन 2 एप्रिल रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7.7 (अ) व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लासलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता आढळून आली असून, हे संपूर्ण घबाड जप्त करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी करीत आहेत.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे
