सा पोलीस व्हिजन च्या पाठपुराव्याने शेवाळी (दा) गावात इलेक्ट्रिक पोल मंजूर.पोल टाकायला येणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचारींना ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे सरपंच नितीनदादा साळुंके यांचे आवाहन.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;

साक्री…. शेवाळी (दा).ता साक्री येथील गावात नवीन वस्ती वार्ड क्रमांक चार मध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासून एकाच इलेक्ट्रिक पोल वर सुमारे पंचेचाळीस ते पन्नास घरगुती कनेक्शन होते.त्या मुळे लोड जास्त असल्याने तेथील घरांमधील लाईट कमी दाबाने ग्राहकांना मिळत होती. यासाठी सन 2020 पासून ते सन 2025 पर्यंत साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके व कार्यकारी संपादिका सौ प्रतिभा साळुंके यांनी लेखी पाठपुरावे केले.मा.राजलालसींग पटेल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटी,चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना व मा कार्यकारी अभियंता धुळे ग्रामीण तसेच मा कार्यकारी उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण उपकेंद्र शेवाळी (दा), तसेच मा ऊर्जामंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना पत्रव्यवहार केला होता. तसेच माहिती अधिकारातुनही विद्युत पोलची विचारणा केली होती. त्यामुळे महावितरण कंपनीने येथील या तक्रारीबाबत वरिष्ठांना वाढीव पोल इस्टिमेट मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावना मंजुरी मिळाली असून नऊ पोल वार्ड क्रमांक चार साठी मंजूर झाले आहेत. असे गावचे सरपंच नितीनदादा साळुंके यांनी सा पोलीस व्हिजन चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांना फोन करून माहिती दिली.त्या नुसार दिनांक.06 जुन 2025 रोजी शेवाळी उपकेंद्र येथे सा पोलीस व्हिजन चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पोलीस व्हिजन द्वारे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात वार्ड क्रमांक चार मध्ये योग्य त्या ठिकाणी मंजूर इलेक्ट्रिक पोल लावण्यात यावेत. ज्या गल्लीमध्ये इलेक्ट्रिक पोल नाहीत त्याच ठिकाणी कोणालाही अडथळा होणार नाही अशा ठिकाणी इलेक्ट्रिक पोल तातडीने टाकून उच्च दाबांमध्ये ग्राहकांना वीज पुरवठा व्हावा यासाठी सदर निवेदन देण्यात आले आहे. सदर समस्त शेवाळे ग्रामस्थांना विनंती आहे की इलेक्ट्रिक पोल मंजूर होऊन आलेली आहेत. ते बसवण्यासाठी खाजगी टेंडर दिलेले असते. त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना इलेक्ट्रिक पोल टाकण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण ग्राहकांची यामुळे मोठी सोय होणार आहे. इलेक्ट्रिक पोल मंजुरीसाठी फार मोठी प्रोसेस असते. जर हे पोल पुन्हा परत गेले तर त्यानंतर ग्राहकांना पैसे भरूनच असे पोल मिळत असतात. यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसत असतो. गावाची सुधारणा होत आहे त्यामुळे प्रत्येकाने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. असे आवाहन गावचे सरपंच नितीनदादा साळुंके व माजी मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते निंबाआबा साळुंके,सा पोलीस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके, यांनी केले आहे.यावेळी शेवाळी येथील लाईनमन श्री राजपूत नाना,वायरमन मोहिते किशोर दादा, वायरमन चव्हाण दादा, वायरमन देवरे दादा तसेच अहिरे वायरमन यांनी वेळोवेळी मदत केली आहे.आज निवेदन देण्यासाठी लक्ष्मणआबा साळुंके , चंद्रकांत जाधव,उखाजीभाऊसाहेब व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी विद्युत महावितरण उपकेंद्र शेवाळी च्या कर्मचारींनी ग्राहकांना फुल दाबाने विज पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र डि पी बसवण्यात आली आहे.या नवीन पोल टाकले गेल्यावर लोड डिव्हाईड होण्यासाठी मदत होईल.त्या मुळे ग्राहकांनी पोल टाकण्यासाठी गल्लीमध्ये सहकार्य करणे गरजेचे आहे.असे आवाहन केले आहे.या वेळी महावितरण उपकेंद्र शेवाळी येथील अधिकारी व सर्व स्टॉफ चे आभार सा पोलीस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी मानले आहेत.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 40;