
शिवसेना माजी आमदार अनिल गोटे व शिवसेना पदाधिकारी यांच्या आक्रमकतेमुळे सापडले
एक कोटी 84 लाख 84 हजार दोनशे रुपये
==============शासकीय विश्रामगृहाच्या कपाटात प्रशासनातील अधिकाऱ्यां समोर मशीन द्वारे मोजण्यात आल्या नोटा
विधिमंडळ आमदारांची अंदाज समितीचा प्रताप
धुळे शहरातून तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार दोनशे रुपयांचा मलिदा गोळा
शिवसेना माजी आमदार अनिल गोटे शिवसेना पदाधिकारी यांच्यामुळे प्रशासनाला करावी लागली कारवाई.
सहा तासाच्या ठियानंतर देखील पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, अँटी करप्शन ब्युरो च्या अधिकारी यांची कारवाई टाळाटाळ
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, अँटी करप्शन ब्युरो चे संचालक, नाशिक विभाग आय.जी. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यापर्यंत मोबाईल द्वारे संभाषण करूनही अधिकाऱ्यांची हतबलता
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या ट्विट नंतर प्रशासनाला आली जाग,
सहा तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनातील अधिकारी पंचनामासाठी हजर
शिवसेना नेते संजय राऊत संपर्कप्रमुख अशोक धात्रक
रात्रभर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संपर्कात
कोणत्या विभागाने किती पैसे दिले याची यादी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक आंदोलनात आक्रमकतेमुळे मिळाले यश
धुळे= महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा तसेच विकास कामांचे अंदाजपत्रक सादर करण्याकरता महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आमदारांची समिती तीन दिवसाच्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता या समितीने धुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रशासकीय बैठकांसाठी धुळे शहरापासून तब्बल पाच किलोमीटर दूर असलेल्या अलिशान हॉटेल टॉप लाईन मध्ये पंचतारांकित व्यवस्थेत बैठका घेतल्या यासाठी धुळे जिल्हा प्रशासन तसेच
प्रशासनातील कर्मचारी झाडून पुसून उपस्थित होते, सकाळी सुरू झालेल्या या बैठका दुपारपर्यंत सुरू असताना या ठिकाणी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व आमदार आमदारांसोबत आलेले त्यांचे स्वीय सहायक यांना स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आनंद हॉटेल टॉप लाईन मध्ये घेता आला एकीकडे या बैठका सुरू असताना धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमोहर येथील शासकीय विश्रामगृहात रूम नंबर 102 मध्ये या समितीचे अध्यक्ष आमदार यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या वतीने काही महत्त्वाच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसोबत धुळे जिल्ह्यातील विविध विभागातील प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचे काम बिनोबा भाट पद्धतीने कोणालाही न घाबरता अगदी बिनधास्तपणे सुरू होते, एकीकडे बैठका सुरू असताना दुसरीकडे गुलमोहर विश्रामगृहात शासकीय वाहनातून अधिकारी पैशांच्या नोटांचे बंडल भरलेले ट्रॅव्हलिंग बॅग या रूम नंबर 102 मध्ये व तसेच गुलमोहर विश्रामगृहाच्या आरक्षित करण्यात आलेल्या सूटमध्ये जमा करून जात होते. दुपारपर्यंत हे कलेक्शन गोळा करण्याचे काम अगदी बिनधास्तपणे सुरू असताना धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे व उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांना याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे महानगरप्रमुख धीरज पाटील यांना ही गोष्ट कानावर घातली, महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी यांना तातडीने संपर्क साधून गुलमोहर विश्रामगृहात जमावयास सांगितले, तोपर्यंत सायंकाळी पाच वाजेपासून माजी आमदार अनिल गोटे यांनी गुलमोहर विश्रामगृहातील रूम नंबर 102 चा ताबा घेऊन त्या ठिकाणी ठिय्या नरेंद्र परदेशी व पदाधिकाऱ्यांसोबत मांडला. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अँटी करप्शन ब्युरो यांना सूचित देखील केले पोलीस अधीक्षकांनी लवकरच येतो असे सांगून येण्यास टाळाटाळ केली, तोपर्यंत त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व धुळेकर नागरिकांची गर्दी जमा झाली, तब्बल सहा तास माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, क्षेत्र प्रमुख भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, एडवोकेट भूषण पाटील, सलीम लंबू, चिलू आवळकंठे, निंबाजी मराठे, सुनील पाटील,राजु ढवळे, आनंद जावडेकर, डॉ.संजय पिंगळे,कपिल लिंगायत, भोला गोसावी, दिपक चुम्बन वाघ,चंद्रकांत हजारे, डॉ. सोमनाथ चौधरी, सचिन रुणवाल, अनिल शिरसाट ,अजय चौधरी, कुणाल कानकाटे ,पिनू सूर्यवंशी, मनोज जाधव, हिमांशु परदेशी, निलेश कांजरेकर, सागर निकम, सचिन रूणवाल,आबा भडांगे , पंकज भारस्कर, संदीप चौधरी, शुभम मतकर, पिंटू ठाकूर डॉ. अनिल पाटील, केतन भामरे ,मुकेश भोकरे ,रोहित भतवाल, अनिल चौधरी ,हर्षल वाणी, बंटी अहिरे, सादिक पठाण, चिलू आवळकंठे, आदी पदाधिकाऱ्यांसह ठिय्या मांडला, या कारवाई संदर्भात प्रशासन टाळाटाळ करत असताना माजी आमदार अनिल गोटे, नरेंद्र परदेशी, एड. भूषण पाटील,धीरज पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करून माहिती दिली. धीरज पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मेसेज करून माहिती दिल्यावर खासदार संजय राऊत यांनी तातडीने अनिल अण्णा गोटे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेत त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून घडलेल्या प्रकाराबाबत ट्विट केले, त्यांच्या या ट्विट नंतर प्रशासन खडबडून जागे झाले, रात्री साडेदहाच्या सुमारास प्रशासनातील अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता, महसूल विभागाचे अधिकारी यांच्या नेतृत्वात शासकीय पंच व तसेच तक्रारदार पंच म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत रूम नंबर 102 चे कुलूप कटरने तोडून आत मध्ये प्रवेश करून या रूमची झाडाझडती घेतली, या ठिकाणी नव्याने विकत घेतलेल्या ट्रॅव्हलिंग बॅग तसेच रिकाम्या झालेल्या पाच ते सात ट्रॅव्हलिंग बॅग आढळून आल्या त्यानंतर या रूम मधील कपाट चेक केल्यानंतर एक संपूर्ण कपाट भरून प्लास्टिकच्या काळात थैलीमध्ये नोटांचे बंडलच्या बंडल रचून ठेवण्यात आल्याचे अधिकारी व पंचांना आढळून आले, नोटांचे भले मोठे बंडल आणि थप्प्या पाहून अधिकाऱ्यांनी लागलीच नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवले रात्री अकरा वाजता नोटा मोजायला सुरुवात झाल्यावर रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत या नोटा मोजण्याचे काम सुरू होते शेवटी तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 इतकी रक्कम या ठिकाणी मोजण्यात आली. या सर्व रकमेचे बंडल तयार करून तसेच पंचनामा करून स्वतःचा पंचनामा टाईप करून पहाटे साडेचार वाजता अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत नोटांच्या पाकिटांना व रूम नंबर 102 ला सिल पॅक करण्यात आले यानंतर पोलीस प्रशासनाने हे सर्व पैसे पोलीस विभागाकडे तीन-तीन भल्या मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅग मधून पोलीस अधीक्षक कार्यालयात नेले,
सदरचा प्रकार गुलमोहर विश्रामगृह येथे सुरू असताना विधिमंडळ आमदारांच्या समितीत आलेले आमदार या समितीचे अध्यक्षांसह सर्वांनी हळूहळू धुळे जिल्ह्यातून धुळे शहरातील ऑफलाईन हॉटेल मधून विविध मार्गाने पळ काढला, या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टोल तसेच सोलापूर धुळे महामार्गावरील टोल व सुरत महामार्गावरील टोल वरील सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज देखील प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली, तसेच गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीव्हीचे फुटेज आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपासून तर घटनेच्या कालावधीपर्यंत म्हणजे पंचनामा पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावी अशी अशी मागणी केली, या संपूर्ण प्रक्रियेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच विविध चॅनलचे प्रतिनिधी विविध वर्तमानपत्रांचे धुळे जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रीय न्यूज चॅनलचे धुळे जिल्हा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू होती तसेच या संदर्भात विविध चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज देखील सुरू झालेल्या होत्या,
पहाटे साडेचार वाजता पंचनामाचे काम संपून चार वाजून 4.41 मिनिटांनी पोलीस अधिकारी या ठिकाणाहून बाहेर पडले यावेळी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले असता पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली,
शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे व शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी यांच्या आक्रमकतेमुळे आमदारांच्या समितीचा भांडाफोड धुळे जिल्ह्यात झाला त्यामुळे प्रशासनातील अधिकारी चांगले धास्तावले असून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती या प्रकारामुळे चपराक बसणार आहे.
याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर रात्रभर धुळेकर नागरिक देखील या विश्रामगृहाला भेट देऊन सत्यता पाडताळून पहात होते.असे शिवसैनिक
धीरज पाटील
महानगर प्रमुख शिवसेना यांनी कळवले आहे
🚩🚩🙏🏻🚩🚩
