गावात रील बनवता, बनवता, 40 हजार फॉलोअर्स बनले, 5 मुलांची आई एक दिवस युजरच्या प्रेमात पडली आणि मग….Police Vision News: महिला इन्स्टाग्रामवर रील बनवून पोस्ट करायची. आपल्या आयुष्यात असं काही घडेल याची तिला कल्पनाही नव्हती. नेमकं या प्रेम प्रकरणाची सुरुवात कशी झाली? महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिने तिथे काय सांगितलं?तुम्ही पाकिस्तानच्या सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीणाच्या लव्ह स्टोरीबद्दल ऐकलं असेल. आता अशीच एक लव्ह स्टोरी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये समोर आलीय. इथे महिला आणि तिच्या प्रियकराने देशाची सीमा ओलांडली नाही, पण प्रेमाची सीमा नक्कीच ओलांडली. महिलेचे एक युवकासोबत ऑनलाइन प्रेमसंबंध जुळले. ती युवकाच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिने आपली 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून दिलं. गुजरातला जाऊन ती प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. हे प्रकरण पोलीसात गेलं, तेव्हा महिलेने प्रियकरासोबतच रहायच आहे, असं सांगितलं. ती नवऱ्याला कंटाळली होती.एका दूरच्या खेडेगावात राहणारी ही 32 वर्षांची महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळू हळू तिची रील पाहून हजारो फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत महिलेची मैत्री झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. महिलेच्या पदरात पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाच्या प्रेमात महिला पार बुडून गेली होती. तिने नवरा आणि मुलांना सोडलं.
प्रेमाची सुरुवात कशी झाली?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावात राहणाऱ्या नेमी देवीच लग्न 15 वर्षापूर्वी झिनझिनियालीच्या नारणा राम भील सोबत…
