अमळनेर दंगलीने धगधगतेय!!! संचारबंदी लागू सहा पोलीस जखमी तर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला

अमळनेर..(जळगाव जिल्हा)…. साप्ताहिक पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो … दंगल सारखी परिस्थिती का उद्भवली? दंगल नेमकी का घडवली जाते?? असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना जेव्हा पडतो तेव्हा एकच उत्तर येते ते म्हणजे राजकीय स्टंट. मात्र अमळनेर येथील दंगल जी उसळली ती केवळ मुलांच्या भांडणातून दोन गट एकमेकांना भिडले आणि दंगल निर्माण झाली. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली. यानंतर बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला असून, तलवार हल्ल्यात एक पोलीस अधिकारी तसेच दगडफेकीतील तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 29 जणांना अटक केली आहे शहरात तीन दिवसांसाठी 144 कलम प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील वातावरण भयभीत झाले आहे. जीनगर गल्ली सराफ बाजार, पान खिडकी, खड्डाजीन, जुना पारधी वाडा, भागात तणावपूर्ण शांतता आहे . दोन ते तीन लहान मुलांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून चक्क दोन गटात दगडफेक झाली 9 जून रोजी रात्री साडेदहाला जिंजर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डीवायएसपी सुनील नंदवाळकर चोपडा डी वाय एस पी ऋषिकेश रावळे यांनी रात्री भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी आरोपींची धडपकड करीत 29 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 61 जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण मिळवले मात्र अजूनही तणाव कायम आहे दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कैलास कडलग, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत 10 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 12 जूनच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे त्यामुळे सर्व अंमळनेर शहरातील व्यवहार ठप्प पडले असून. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने अंमळनेर शहरांमध्ये संचारबंदी लागू केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे. आज लग्न तिथी मोठी असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वराडाला मात्र संचार बंदीमुळे भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने लग्न समारंभासाठी येणाऱ्या सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सहकार्य करण्याची भावना लग्न ज्यांच्या घरी आहे अशा कुटुंबाच्या व्यक्तींनी मागणी होत आहे असे बोलले जात आहे. लग्न वारंवार होत नाहीत. लग्नाचे नियोजन एक ते दोन महिने आधीच झालेले असतात. त्यामुळे संचारबंदी जरी लागू असेल तरी त्या ठिकाणी असे अपवाद वगळता पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा वर्हाडीमंडळींकडुन वर्तवली जात आहे. बातमी पत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *