वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर…सा पोलीस व्हिजन धुळे
धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व संस्थाचे वतीने दि.१८ ऑगस्ट रोजी संस्थेचा २१ वा वर्धापन दिवस आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जीवन गौरव, समाजभुषण पुरस्कार सोहळा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या भवन मध्ये आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, कुंभार समाज समाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतिष दादा दरेकर, युवाध्यक्ष संजय जोरले, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपंळकर, विधान सभा क्षेत्र प्रमुख अनुपभैया अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार आदी मान्यवरांच्या हस्ते व्दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी जुने धुळे येथील कुंभार खुंटावर, संत शिरोमणी गोरोबाकाका यांचे स्मारक उभारून, चौकाचे सुशोभीकरण करण्यात येईल अशी चंद्रकांत सोनार यांनी कार्यक्रमात घोषणा केली. सदरच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याचा तसेच समाजातील जेष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते विवीध पुरस्कार देवून उचीत सन्मान करण्यात आला. जिवनगौरव पुरस्काराने श्री.उमाजी दगडू सुर्यवंशी(छत्रपती संभाजी नगर), समाज भुषण पुरस्कार श्री. सोमनाथ पुजुं सोनवणे (नाशिक), चन्द्रशेखर कडू कापडे (जळगांव) अशोक निंबा सोनवणे (सटाणा), पिराजी परबत सोनवणे(साक्री), आदर्श शिक्षक पुरस्कार शेखर जिभाऊ बागुल (पिंपळनेर), आदर्श माता पुरस्कार सौ. सखुबाई बन्सीलाल कुंभार (शिरपूर), आदर्श मातापिता पुरस्कार सौ व श्री हिराबाई भटु, कौतिक बच्छाव(धुळे), श्री बापू नथ्थू जगदाळे, बन्सीलाल कुंभार(शिरपूर), सौ व श्री हिराबाई भटु कौतिक बच्छाव, उद्योगरत्न पुरस्कार श्री बापू नथ्थू जगदाळे(पारोळा) तसेच रमेश बहाळकर, भाऊसाहेब सुर्यवंशी यांचे देखील प्रशासकीय सेवेत उत्तमकाम केल्या बदल सत्कार करण्यात आला. तसेच धुळे जिल्हा कुंभार समाज कार्याध्यक्ष श्री.सुभाष कुंभार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रु५०००/- पुढील शिक्षणासाठी रोख रक्कम देवून आर्थीक मदत करुन समाजापुढे आदर्श निमार्ण केला आहे. हतिक हरीश कुंभार, प्रजापत कु रजवीर, राजू कुंभार, दुर्गेश अशोक कुंभार, डिंगबर रविंद्र कुंभार, नंदिनी कैलास कुंभार ईत्यादी गरजू विद्यार्थ्यांना रोख मदत देण्यात आली. कार्यक्रमासाठी समाजातील सर्व समाज बांधवानी आर्थीक मदत देवून सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी केला. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला संघटना, युवा आघाडी, पारंपारीक व्यवयाय आघाडी, विटभट्टी आघाडी आणि मुर्तीकार आघाडी यांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन अध्यक्ष धुळे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश बहाळकर यांनी मानले .
