
एस टी महामंडळ सामान्य प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे. धुळे … महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर रस्त्यावर धावणारी खेडेपाड्यामध्ये कानाकोपऱ्यात पोचणारी आपली हक्काची सामान्य जनतेच्या प्रवासाची एसटी बस ही डोळ्यासमोर उभी राहते. कोरोना काळामध्ये लाँक डाऊन झाला. आणि या एसटी बसची रस्त्यावर धावण्याची चाके थांबली. दोन वर्ष बसेस डेपो मध्ये अशाच पडून राहिल्या. आणि त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाल्यावर पुन्हा या लाल परीने रस्त्यावर येण्याचे धाडस केले. पण शासनाने त्यातच वेगवेगळ्या मोफत योजना देऊन प्रवासी आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी शक्कल लढवली. बुद्धांना मोफत प्रवास, दिव्यांगांना वन फोर, महिलांना 50 टक्के सवलत, शाळकरी मुलांना पास मध्ये सवलत, दररोज प्रवास करणाऱ्यांना सवलत, आणि याच सवलतीमुळे एसटी महामंडळाला जो पूर्ण मोबदला प्रवासाच्या तिकिटातून मिळत होता तो मिळणे कमी झाले. त्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स करणे कठीण झाले. जशा अवस्थेत तुटल्या फुटलेल्या छत गळक्या लाल परी रस्त्यावर धावतच राहिली त्यातून अनेक एसटी गाडी आपण रस्त्याने नादुरुस्त झाल्याचे पाहिले आहे. एसटीत प्रवास करताना तो पूर्ण होईल याची आता गॅरंटी कुणालाही नाही. कधी रस्त्यात बस पंक्चर झालेली, गिअर बॉक्स मुळे बंद पडलेली, रेडिएटर फुटल्यामुळे बंद पडलेली, कधीकधी मागील दोघेही चाकण निखळून शेतामध्ये जाऊन पडलेले अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपली लाडकी एसटी आता रोज रस्त्यावर दिसू लागली आहे. ती पूर्ण जीर्ण झालेली आहे. तरीदेखील महामंडळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्या बसेस तशाच पद्धतीने वापर करत आहेत. बस मध्ये प्रवाशांची ठरलेली संख्या असते परंतु ओव्हरलोड प्रवासी भरून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही एसटी रस्त्यावर धावत असताना मात्र आरटीओचे कोणतीही दंडात्मक कारवाई एस टी बस वर झाली असे आजपर्यंत ऐकण्यात आले नाही. शासनाचा हा भोंगळ कारभार थांबवला पाहिजे. एस टी महामंडळ मधील सर्व प्रवाशांना ज्या सवलती दिल्या गेले आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आणि पूर्ण तिकीट दराने प्रवास केल्यास जो पैसा महामंडळाला मिळेल त्यातून नवीन बसेस घेतल्या पाहिजेत किंवा ज्या 50% बसेस चांगल्या आहेत त्यांच्यावर सुधारणा करण्यासाठी खर्च केला पाहिजे सामान्य प्रवासी चा जीव फार महत्त्वाचा आहे एक प्रवाशाचा जीव जेव्हा जातो तेव्हा विमा कंपन्यांकडून पैसा दिला जातो पण तो पैसा देखील आपल्या सर्वसामान्यांचा असतो हा देखील विचार केला पाहिजे म्हणून महामंडळाने तातडीने शासनाकडे मोफत सवलती बंद करण्याबाबत आग्रह धरला पाहिजे आणि पूर्वीसारख्या ज्या एसटी महामंडळाने सेवा दिली आहे तशी सेवा चांगल्या पद्धतीने आज मिळाल्या तर एसटी महामंडळावरचा पूर्वीसारखा विश्वास सामान्य जनतेचा नक्कीच राहणार आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे
