धुळे : सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…. धुळे शहर म्हटले की, राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रात अनेकदा खळबळ उडवून देणारे हे शहर आहे. येथे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी चांगले यावेत शहराची कायदे सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांना आशा असते. शहरात विविध अवैध धंदे यांच्यावर पायबंध घालण्यासाठी पोलीस दल महत्त्वपूर्ण कामगिरी करत असते. आता शासनाच्या वतीने राज्यातील पोलिस अधीक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाच्या अवर सचिवांनी सोमवारी सायंकाळी बदल्या केल्या असून त्यात धुळ्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक पोलिस अकादमीत येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे अधीक्षक श्रीकांत धीवरे धुळे येथे बदलून येत आहेत. अशी माहिती साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे यांना सुत्रांनी दिली.
जळगाव अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची नाशिक पोलिस अकादमीत बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्राचार्य अशोक नखाते बदलून येत आहेत. या पोलीस अधीक्षकांच्या व इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलीस दलात नव्याने येणारे पोलीस अधीक्षक आपल्या धुळे जिल्ह्यासाठी पुढे कसे त्यांची कामगिरी सिद्ध करतात?? याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.
