Home  क्राईम

Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

लोक अभिरक्षक यांच्या प्रयत्नाने सत्र खटल्यातुन आरोपींची निर्दोष मुक्त

 18/08/2023

Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

0

SHARES

महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

धुळे : पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सन २०१२ साली पिडीतेवर अत्याचार झाल्या प्रकरणी ३ लोकांविरुध्द बलात्कार, संगणमताने दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासाअंती दोषारोपत्र दाखल करून सदरचा खटला सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता. या खटल्याचा अंतिम निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयात झाला असून, आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे मुख्य लोक अभिरक्षक यानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व आरोपीची बाजू प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडली त्यामुळे सत्र न्यायालयाने या आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. असे लोक अभिरक्ष कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲड . ज्ञानेश्वर महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सदर खटल्यात आरोपीच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी नियुक्त केलेले मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर एस. महाजन यांनी मोफत कामकाज चालविले व त्यांना उप लोक अभिरक्षक अँड अबरार सी. सय्यद, सहाय्यक लोक अभिरक्षक अँड. मुकेश पी. पाचपुते, अॅड, रमीज शेख, अॅड. भाग्यश्री एस. बाप, अॅड. मोक्षा आर. कोचर यानी मोलाचे सहकार्य केले. आरोपी हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्यामुळे त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्याकडे त्यांचा खटला चालविण्याकामी शासन खर्चाने मोफत वकील मिळण्यासाठी अर्ज केला होता. कारण ते खाजगी वकीलांची फि देऊ शकत नव्हते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी आरोपीचे कामकाज चालविणे कामी सदरचा खटला  लोक अभिरक्षक कार्यालयाकडे वर्ग केला व मुख्य लोकअभिरक्षक अँड. ज्ञानेश्वर महाजन यांनी स्वतः सदर खटला मोफत चालविला.

काय आहे लोक अभिरक्षक (विधी सहाय्य बचाव पक्ष ) प्रणाली

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रत्येक जिल्ह्यात ज्या न्यायबंदी अथवा गरजू व्यक्ती खाजगी वकील लावण्याची आर्थिक परिस्थीती नाही असे न्यायबंदी अथवा आरोपी न्यायापासून वंचित राहु नये व न्यायालयात त्यांची बाजु प्रभावीपणे मांडण्याकरीता शासन खर्चाने मोफत वकील मिळावा याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी विधी सहाय्य बचाव पक्ष म्हणजेच लोक अभिरक्षक प्रणाली सुरू केली आहे.

त्याचाच भाग म्हणून धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यानी लोक अभिरक्षक म्हणून तज्ञ वकीलांची नियुक्ती केलेली आहे. त्या अन्वये लोक अभिरक्षक कार्यालयात मुख्य लोक अभिरक्षक, उप लोक अभिरक्षक व सहाय्यक लोक अभिरक्षक म्हणून म्हणुन तज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयातील सर्व लोक अभिरक्षक दैनंदिन होत असलेल्या कायद्यांमधील बदल तथा मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या विविध न्यायनिवाडयांचा अभ्यास करून लोक अभिरक्षक कार्यालयात आलेल्या प्रत्येक खटल्यातील आरोपीची बाजु प्रभावीपणे मांडतात.

राष्ट्रीय, राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे मार्फत कार्यान्वीत झालेले लोक अभिरक्षक प्रणाली द्वारे धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात स्वतंत्ररित्या लोकअभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर एस. महाजन, उप लोक अभिरक्षक अँड अबरार सी. सय्यद, सहाय्यक लोक अभिरक्षक अँड मुकेश पी. पाचपुते, ॲड . रमीज एच. शेख, अँड. भाग्यश्री एस. वाघ, अँड. मोक्षा आर. कोचर हे सर्व विधीज्ञ गोरगरीब, वंचीत व गरजु आरोपीची प्रभावीपणे बाजु न्यायालयासमोर मांडत आहेत व गरजू लोकांना न्याय मिळवून देत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांचे लोक अभिरक्षक प्रणालीद्वारा महिला, न्यायबंदी, अनुसुचित जाती,जमाती, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी आहे तथा गरजु व न्यायापासून वंचीत राहणाऱ्या आरोपींना याचा लाभ मिळणार आहे.तरी यांचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे मुख्य लोक अभिरक्षक ॲड. ज्ञानेश्वर महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *