यापुढे सैनिकांच्या भल्यासाठीच माझी संघर्षाची लढाई, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांची “अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र”(सीएपीएफ) संस्थेच्या प्रवक्तापदी नियुक्ती.

धुळे- (साप्ताहिक पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)… एका सामान्य कुटुंबातील एक तरुण म्हणजे धनंजय गाळणकर होय. धुळे शहरात कुठलीही चांगली सामाजिक सेवा करण्याचे धाडस करणारा नवतरुण धनंजय गाळणकर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची आज विशेष नियुक्ती झालेली आहे करिता साप्ताहिक पोलीस व्हिजन प्रेस परिवाराच्या वतीने त्यांचे प्रथम हार्दिक अभिनंदन.शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर हे जनसामान्यांचे मुलभूत हक्काच्या प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे सातत्याने नेहमीच वाचा फोडत असतात. तसेच आपल्या भारत देशाचे “केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या” जवानांच्या स्वभिमानाच्या प्रश्नांना देखील धनंजय गाळणकर यांनी आपल्या लेखणी द्वारे सातत्याने वाचा फोडली आहे. याचीच दखल घेवून, “अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र”(सीएपीएफ) संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शितल सुरेश कोरवी यांनी मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांची संस्थेचे प्रवक्ते व माध्यम प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे नियुक्तीपत्र दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी धनंजय गाळणकर यांना प्राप्त झाले आहे. संस्थेला जुळलेल्या अर्धसैनिकांत सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, आणि आसाम रायफल या विभागातील जवानांचा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग आहे. सदर संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून राज्यातील अर्धसैनिक, (सीएपीएफ) हा परिवार खुप मोठा व विखुरलेला व राष्ट्र सेवेसाठी समर्पित आहे. राज्यातील (सीएपीएफ) जवान हे आपल्या मुलभूत हक्काच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत. सदर जवानांना व त्यांच्या आश्रीतांना यासंदर्भात जागृकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील सर्व (सीएपीएफ) अर्धसैनिक जवानांना व त्यांच्या आश्रीतांना संघटीत करणेसाठी, अर्धसैनिक जवानांच्या कल्याणासाठी संस्थेमार्फत राबविले जाणाऱ्या योजना, प्रकल्प, आदि योजना महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या जवान व त्यांच्या आश्रीतापर्यंत पोहचवणे, व संस्थेशी सदर अर्धसैनिक जवान व त्यांचे आश्रीतांना जोडण्यासाठीचे प्रयत्न, यामुळे सदर संस्थेची (सीएपीएफ) जवानांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांच्या आवश्यक असणाऱ्या हक्काच्या सर्व सोई सुविधा प्रगतीपथावर उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होईल. त्याच बरोबर राज्यातील अर्धसैनिक (सीएपीएफ) जवानांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक किंवा परिवारीक फसवणूक करणारे व खोटे गुन्हे दाखल करून जवानांना प्रताडीत करणाऱ्या असामाजिक तत्वांची सत्यथा बाहेर आणून जवानांना तणावमुक्त व जागृत करता येईल. यासाठी आपण आपल्या पत्रकारितेने मोलाची कामगिरी करावी. अशी अपेक्षा “अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र”(सीएपीएफ) संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल सुरेश कोरवी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवानिवृत्त उपनिरिक्षक श्री. संदीप कडूस्कर आणि कायदे विषयक सल्लागार जेष्ठ विधीज्ञ अँड. विलास खरात यांनी मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांची नियुक्ती करतांना अपेक्षा व्यक्त केली आहे, आणि यापुढे अर्थ सैनिक जवानांच्या मूलभूत न्याय हक्कांच्या लढाईसाठी माझा संघर्ष असेल अशी भावना गाळणकर यांनी व्यक्त केली. नियुक्ती झाल्याबद्दल धनंजय गाळणकर यांचे महाराष्ट्रातील सर्व अर्धसैनिक दलांचे (सीएपीएफ) अधिकारी व जवानांनी अभिनंदन कले आहे, आणि भावी क्रांतीकारी कार्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *