सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रश्न संच वाटप गट साधन केंद्र सुंदरदे ता जि नंदुरबार येथील केंद्रातील शाळांना शासनाच्या संकलित चाचणी परीक्षा प्रश्नसंच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रत्यक्ष प्रश्न संच वाटप सुंदरदे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख बापुसाहेब देसले सो.यांनी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास आर सुर्यवंशी सर,श्राफ संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक बापूसाहेब मिलींद माळी,सोबत सह शिक्षक श्री धनगर सर यांना प्रश्न संच वाटप करताना दिसत आहेत.शुक्रवार दिनांक.27-10-2023 रोजी सुंदरदे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद नंदुरबार शालेय शिक्षण विभाग व्दारा शिक्षकांसाठी शिक्षक परीषद चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळा या शिक्षक परीषद साठी उपस्थित होते.शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती साधन उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी उपस्थित शिक्षकांना दुपारच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट केली होती.सदर संकलित चाचणी परीक्षा सोमवार दिनांक..30-10-2023 ते 1-11-2023 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती 100% ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे.भाषा, गणित, इंग्रजी या मुख्य तीन विषयांच्या या परीक्षा होणार सोबतच नियमित प्रथम सत्र परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी द्यायचीच आहे असे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी या वेळी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️सा पोलीस व्हिजन धुळे