
ग्रामसेवक पुरस्कार साठी मलांजण येथील ग्रामसेविका श्रीमती रुपाली देवरे यांची सन 2017-2018 साठी शासनाने निवड केली आहेधुळे…. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागात ग्रामपंचायत म्हणजे विधिमंडळ असते. ग्राम सुधार व गावातील सर्व प्रशासकीय कामांमध्ये ग्रामपंचायत चे महत्वपूर्ण कार्य असते. साक्री तालुक्यातील मलांजन या गावातील ग्रामपंचायत सण 2017- 18 या वर्षासाठी उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रशासक ग्रामसेविका म्हणून श्रीमती रूपाली देवरे उर्फ सौ.रूपाली किरण सोनवणे (मराठे) यांची निवड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे आदर्श ग्रामसेवक दिला जातो.हा पुरस्कार दोन ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आठ वर्षातील पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद तर्फे ग्रामसेवकांना सन 2015 16 पासून पुरस्कार वाटप झाले नव्हते त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजी होती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी पुरस्कार वाटपासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यानुसार निवड समितीतर्फे सीओ शुभम गुप्ता यांनी पुरस्काराची घोषणा केली येत्या 2 ऑक्टोबरला सन 2015 ते 2023 या आठ वर्षातील 32 ग्रामसेवकांना पुरस्कार दिले जातील.सौ रुपाली किरण देवरे या मलांजण येथील श्री तानाजी गंगाराम सोनवणे (मराठे) व सौ मंदाकिनी तानाजी सोनवणे (मराठे ) यांच्या सुनबाई असुन सामाजिक कार्यकर्ते श्री किरण तानाजी मराठे यांच्या धर्मपत्नी आहेत.ग्रामसेविका रुपाली देवरे यांनी व सरपंच, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या ग्रामपंचायत मार्फत आपले मलांजन अतिशय आदर्श गाव असे सुधारणा करून शासनाचा पुरस्कार प्राप्त केला आहे आणि याच कार्यातून त्यांनी आपल्या ग्रामपंचायतचा हा पुरस्कार मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.नेहमी सहकार्य करणारे प्रेरणा स्थान श्रीमान ऋषिकेश मराठे व त्यांच्या धर्मपत्नी सरपंच यांचे सतत सहकार्य असते.सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी श्रीमती रुपाली देवरे ग्रामसेविका यांचे अभिनंदन केले आहे.सा.पोलीस व्हिजन तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
