राजस्थानमधील कोटा येथे प्रवासी वाहनाला भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 6 जखमी

वृत्त क्र. 957

मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये; जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार

धुळे, दि. 22 नोव्हेंबर 2026 (जिमाका वृत्त) : राजस्थानमधील कोटा येथे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलर वाहनाला मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनात एकूण 15 व्यक्ती प्रवास करीत होत्या, अशी माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-18/CL/3005 असा आहे. या वाहनातून धुळे जिल्ह्यातील 15 प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात मृत्यू झालेल्या 9 व्यक्तींचे मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच जखमी झालेल्या 6 व्यक्तींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

अपघातातील मृत व्यक्तींची नावे :
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 1) सजन दौलत पवार, 2) उषाबाई सजन पवार, 3) माधवी गणेश पवार, 4) साऊ गणेश पवार, 5) कैलास भगवान पवार, 6) अनिता कैलास पवार, 7) जानवी कैलास पवार, 8) बाबूलाल दौलत पवार आणि 9) सुशिलाबाई बाबुलाल पवार यांचा समावेश आहे. या सर्व व्यक्ती धुळे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

अपघातातील जखमी व्यक्तींची नावे :
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये 1) मनीषा शरद पवार (वय 41 वर्षे), 2) मयुरी शरद पवार (वय 20 वर्षे), 3) जगदीश कैलाश पवार (वय 10 वर्षे), 4) श्रीजीत गणेश पवार (वय 4 वर्षे), 5) शरद बाबूलाल पवार (वय 45 वर्षे) आणि 6) गणेश सय्यद पवार (वय 32 वर्षे) यांचा समावेश आहे. जखमी व्यक्ती धुळे येथील रहिवासी असून, त्यांना कोटा येथील स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

कोटा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे अपघातातील मृत व जखमी व्यक्तींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने कळविले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दुर्घटनेबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार असल्याची माहितीही जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
००००००००००

सा.पोलीस व्हिजन धुळे… मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके

कार्यकारी संपादिका सौ प्रतिभा साळुंखे