लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधन साजराभडगाव (जावेद शेख)कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. कार्डशिट पेपर,चहाचे कप,दोरा,रंगीत मनी इत्यादी साहित्याचा उपयोग करून शाळेच्या मुलींनी स्वतः राख्या बनवल्या. मुलांनीही बहिणींना पेन, पेन्सिल,चॉकलेट अशा भेट वस्तू दिल्या. पारंपारिक पद्धतीने अत्यंत भावनिक वातावरणात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. फलक लेखन श्री अनंत हिरे सर यांनी केले. श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी रक्षाबंधन निमित्त सुरेख असे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सदैव बहिण भावाच्या पवित्र नात्याचे पालन करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, अनिता सैंदाणे,श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे,अनंत हिरे, सुयोग पाटील,सचिन पाटील, हरिचंद्र पाटील,किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षिका रंगेहात लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात अखेर अडकली धुळे (क्राईम न्यूज ब्युरो.सा.पोलीस व्हिजन… गोपाल म्यांद्रे) : शासकीय अधिकारी हे काही खूप प्रामाणिक असतात पण काही ठराविक भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुळे ते कार्यालय बदनाम होते.त्यातल्या त्यात धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय हे जिल्हा परिषद अंतर्गत धुळे जिल्ह्यातील सतत बरबटलेल्या नावाने नावाजलेले कार्यालय म्हटले जाते. येथे अनेक शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकुन तुरुंगात गेले आणि बाहेर आले.हे कार्यालय वास्तविक धुळे जिल्हा कारागृह च्या अगदी भिंतीला भिंत लागून आहे. म्हणून तुरुंगाची भीती यांच्या मनात कदाचित नसावी.या इमारतीत येथे पूर्वी इंग्रज कालीन घोडे बांधण्याचे ठिकाण म्हणून या इमारतीला महत्त्व होते. मात्र याच घोडेबाजारात अनेक पवित्र शिक्षण क्षेत्रातील काम करणारे शिक्षक वर्ग यांचे शोषण याच कार्यालयात काही कथीत महाभाग पैशांची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणतीही फाईल सरकु देत नाहीत. शिक्षकांचे शोषण करण्यामध्ये येथील काही महाभाग त्यांच्या ठरलेल्या दलालांच्या मार्फत चिरीमिरीची कामे करत असतात. यात काही बांड्या पुढारींचा देखील समावेश आहे. या बांड्या पुढारींनी सुपार्‍या घ्याव्यात आणि इथे ठराविक टेबलवर लाच देऊन कामे उरकून घ्यावीत असा हा प्रकार फार वर्षापासून सुरू होता अशी देखील चर्चा आहे. अनेकांची लाडकी बहीण होती म्हणे.मात्र काही शिक्षक त्रस्त झाले होते. जाळ्यात मोठा मासा कधी अडकेल!! याची सर्वजण आतुरतेने वाटत पाहत होती. आणि ते आज घडले. एकच जल्लोष झाला. काही पीडित शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर मोठी फटाक्यांची लढ देखील फोडण्याची चर्चा सुरू आहे.म्हणतात ना असत्य कधीही सत्य होत नसते. असत्याला शेवटी जेल मध्येच जावे लागते. घडलेली घटना अशी धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.धुळे महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता घेणे बाकी तो मंजुरीसाठी हे दाम्पत्य वारंवार या कार्यालयाच्या खेट्या घालत होते. ते काढून देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस तपासामध्ये सर्व पुढील यात कोण कोण सामील आहे हे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे.

गरजूंना रोख आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप, तर जेष्ठांचा विवीध पुरस्काराने सन्मान, कुंभार समाज संस्थेचा २१ वा वर्धापन दिवस दिमाखदार कार्यक्रमाने संपन्न.

वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर…सा पोलीस व्हिजन धुळे धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व संस्थाचे […]

अंबड प्र.पोलीस निरीक्षक, सुनील पवार व उपनिरीक्षकासह मनपा कर्मचाऱ्यांवर जनसमुदायाचा हल्ला

नाशिक क्राईम न्यूज ब्युरो… वैभव देवरे….सा पोलीस व्हिजन धुळे…… नाशिक….. नासिक येथील अंबड पोलीस स्टेशन […]

धुळे लोकसभा मतदार संघात सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल तसेच मालेगाव शहरात कर्करोग हॉस्पिटल मंजूर करा..!

धुळे…सा पोलीस व्हिजन धुळे….प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रामा केअर व डायलेसीस सेंटरची उभारणी करा – खासदार […]

धुळे लोकसभा मतदार संघात सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल तसेच मालेगाव शहरात कर्करोग हॉस्पिटल मंजूर करा..!

धुळे……प्रतिनीधी..सा.पोलीस व्हिजन धुळे…प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रामा केअर व डायलेसीस सेंटरची उभारणी करा – खासदार डॉ. […]

गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात अखेर अडकले. नंदुरबार… क्राईम न्यूज ब्युरो साप्ताहिक पोलीस व्हिजन…… शासकीय अधिकारी यांना सामान्य जनतेचे सेवक म्हटले जाते, परंतु या सेवकांना या सेवेचा मोबदला म्हणून शासन चांगल्या प्रकारे पगार व सर्व शासन भत्ते देत असते. शासनाकडून यांना इथून तिथे फिरण्यासाठी शासकीय गाडी व चांगल्या प्रकारे आपल्या कार्यालयातील सजलेली केबिन दिली जाते. पण यांची या शासन वेतन व भत्त्यांवर तरी देखील पोटा भरत नाहीत. यांना कोणतेही सामान्य माणसाचे काम करताना लाच मागितल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय चालत नाही. यांचे दलाल हे नेमलेले असतात. या दलालामार्फत किंवा नेमलेल्या पंटरांमार्फत कोणतीही शासकीय कार्यालय असो तेथे चिरीमिरी घेतल्याशिवाय व यांची कमिशन काढल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे सत्य नाकारता येत नाही.शिक्षण विभागात देखील काही पंटर शिक्षकांच्या, मुख्याध्यापक यांच्या बेकायदेशीर मंजुरीसाठी चिरीमिरीच्या प्रकारात मिळालेले असतात असे शिक्षक वर्ग कडुन बोलले जात.असेच गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात सहज अडकले. अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रकमेसाठी 26 हजारांची लाच स्वीकारतांना अक्कलकुवा पंचायत समिती गट विकास अधिकारी सह सहाय्यक लेखाधिकारी हे रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. यामुळे तक्रारदाराकडून यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही म्हणून बिल काढून देण्यासाठी 26 हजारांची मागणी त्यांच्याकडून केली. तक्रारदाराकडून सोळा हजार रुपये स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे यांना आठ हजार रुपयांची रोकड घेताना लाच लुचपत प्रतिबंधक च्या पथकाने रंगेहात पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले. सदर कार्यवाही पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, हेमंत कुमार महाले, सुभाष पावरा, जितेंद्र महाले, यांनी सदर कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. या लाच प्रकरणी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बातमीपत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे

कारगिल विजय विशेष प्रवीण झोळेकरांनी कारगीलच्या जागवल्या आठवणी

१४ हजार फुट उंची, ५ डिग्री तापमानातही पोस्ट सांभाळून पाकिस्तानी अतिरेक्यांचा केला खात्मा सा.पोलीस व्हिजन […]

विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर. सोलापूर : दि.१९ (सा पोलीस व्हिजन, धुळे) विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – १३०/२०२४ अन्वये दिनांक १५/०३/२०२४ रोजी भा.द.वि कलम ३५४-अ,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va),३(१)(w)(ii) प्रमाणे यातील आरोपी रियाज पटेल याच्या विरुद्ध फिर्यादी गोविंद लांबतुरे यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. आरोपी रियाज पटेल याचा एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय असल्याने मागील ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्याच्या एअर कॉम्प्रेसर चे काम करण्यासाठी फिर्यादी हा आरोपी वर विश्वास ठेवुन जकराया शुगर येथील काम सोडून कुटुंबासहित सोलापुर येथे वास्तव्यास होता. त्यानंतर कामानिमित्त तो पुणे,कोल्हापूर,विजापूर व इत‌त्र ठिकाणी फिरून एअर कॉम्प्रेसर चे काम करत होता. २ ते ३ महिने आरोपीने त्यासोबत व्यवस्थित वागला व नंतर विनाकारण मानसिक छळ तसेच शिवीगाळी करू लागला. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गावी असल्याने आरोपीने याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीचे पत्नीचे विनयभंग केला होता व त्यांना “तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकतो” असे म्हणून धमकी दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत आरोपीस विचारले असता आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली तसेच दमदाटीही केली होती आणि “तू कोणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा,माझे कुणीही वाकडे करू शकत नाही असे बोलून अशोभनीय वर्तन केले होते. संशयित आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. संशयित आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी संशयित आरोपीला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात संशयित आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.सुरेश खोसे,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.ऐनिलेश कट्टीमनी,ॲड.सोहेल राम…. बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे ✍️