नंदाणेचे लाचखोर सरपंच, माजी सरपंच एसीबीच्या जाळ्यात पेट्रोलपंप उभारणीकरीता नाहरकत दाखला देण्यासाठी घेतली एक लाखाची लाच धुळे (क्राईम न्यूज ब्युरो)-न खाऊंगा न खाने दूंगा हे वाक्य बऱ्याच जणांनी ऐकले आहे. हे वाक्य कोणी आणि केव्हा आपल्या सामान्य जनतेसमोर सामूहिक भाषणादरम्यान ऐकलेले आहे. एक भारताचे जबाबदार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हे वाक्य. आणि याच वाक्याची वाट लावणारे आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पर्यंत लाचखोर यांची मजाल वाढली आहे. घडलेली घटना धुळे तालुक्यातील नंदाणेगांव येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात सहजपणे अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोलपंप उभारणीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती अडीच लाख रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.नंदाणे ता.धुळे येथील गट नं. ५९/३ येथे तक्रारदाराची शेतजमीन असुन या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता कंपनीच्या विभागिय व्यवस्थापकांनी दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जावुन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. तशी तक्रार आज दि.२४ रोजी तक्रारदार यांनी धुळे लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.या तकारीची धुळे एसीबीने पडताळणी केली असता सरपंच रविंद्र पाटील यांनी व त्यांचेसोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन १ लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांचेकडे दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांचे खिशात ठेवुन घेतली. दोघांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे. जर का कोणी आपणाकडून लाच कोणत्याही विभागामधून मागत असतील तर सरळ आपण अँटीकरप्शन ब्युरो कडे तक्रार दाखल करण्याची हिम्मत केलीच पाहिजे. लाच घेणाऱ्याला ठेसलेच पाहिजे.

भूमापन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात अटकधुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले

धुळे क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन – (सौ.प्रतिभा साळुंके) … सध्या कोणत्याही कार्यालयात जाऊन […]

“ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन: शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान व धोरणांची घोषणा”. पुणे…सा पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो यश साळुंके) दिनांक…. ९: _शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ व त्या उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी विभागाशी निगडित सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. यावेळी विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले कृषी ड्रोन ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोठ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी मजुरांची कमतरता भासते. त्यासाठी कृषी ड्रोन हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहे. आय ओ टेक वर्ड इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले स्वतःचे उत्तम नामांकित ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. या कृषी ड्रोन कंपनीचे नासिक विभागीय असिस्टंट मॅनेजर सेल्स नीरज साळुंके यांनी या कृषी ड्रोन विषयी सविस्तर माहिती दिली. या कृषी ड्रोनमुळे शेतकऱ्यांना फवारणीचे काम सुलभ होणार आहे. पैसा व वेळ वाचणार आहे. मजुरांची गरज नाही.

ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यावतीने ९ ते १२ जानेवारी कालावधीत आयोजित ‘ग्लोबल कृषी […]

महामार्ग पोलीस ठरले बापू नागमोती यांचेसाठी देवधूत, अपघातस्थळी वेळीच पोहोचून तासाभरात त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला.

वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरदि. ६ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा अभियान निमीत्त महामार्ग पोलीस केंद्र […]

विवाह बाह्य संबंधातुन झाला रेल्वे पोलीसाचा खुन, पत्नीचे होते मामेभावासोबत अनैतिक संबंध भुसावळ -(क्राईम न्यूज ब्युरो) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे.अमळनेर येथे श्री मंगळ ग्रह चे सुंदर देवस्थान म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.येथे एक घटना घडली ती अशी की,विवाहबाह्य सबंधास अडचण ठरत असलेला रेल्वे पोलिस नवऱ्याचा पत्नीने तिच्या मामेभावासोबत कट रचून हत्या केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री रबाळे-घणसांगवी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. गुगल पे वरून टाकलेल्या पैश्यावरून खुनाचा उलगडा झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस विजय चव्हाण (रा.सुभाष चौक अमळनेर ) हा पनवेल रेल्वे […]

शेवाळी येथे गल्लीत फेवर ब्लॉग बसवण्याचे काम ग्रामपंचायत कडुन सुरू सरपंच नितीन साळुंके यांचे नागरीकांकडुन कौतुक. धुळे……सा पोलीस व्हिजन धुळे प्रतिनिधी…. शेवाळी हे गाव नागपूर सुरत महामार्ग वर बसलेले गाव असून साक्री तालुक्यातील हे गाव विविध अष्टपैलू नेतृत्वाने नावाजलेले आहे. या गावात शासकीय अधिकारी, शिक्षक, वकील, इंजिनियर ,डॉक्टर, पत्रकार,सदन आधुनिक शेती करणारे शेतकरी, ड्रायव्हर गाडी मालक, इंजिनियर राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांचे गांव म्हणून ओळखले जाते. तिथे पूर्वी मातीची घरे असलेले छोटेसे टुमदार गाव होते ते आता शहरीकरणाच्या सुसंस्कृतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. सिमेंट काँक्रीट ची घरे बंगले या गावात आता दिसू लागली आहेत. ग्रामपंचायत या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. संपूर्ण गावामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक गल्लीमध्ये फेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्या जात आहेत. वॉटर सप्लाय च्या नियोजनातून आता एक दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये रस्त्यांची समस्या होती. ती जागृत व पारदर्शकपणे सर्वांची कामे करणारे राजकीय व्यक्तिमत्व दादासाहेब नितीन साळुंके सरपंच यांनी मनावर धरून स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून वार्ड क्रमांक चार मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे वर फेवर ब्लॉक बसवून सुंदर रस्ते बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम करून दिले आहे. यासाठी साप्ताहिक पोलीस व्हिजन ने देखील दखल घेतली आहे. या गल्लीमध्ये नेहमी पाणी वाहत असताना दिसत होते त्यातून अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होत होता. ही समस्या दादासाहेब नितीन साळुंखे यांच्या कानावर टाकल्यावर त्यांनी तात्काळ या गल्लीत फेवर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण देखील केले आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये विद्युत रोषणाई देखील चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने करून दिली आहे. चांगले कार्य करणाऱ्या राजकीय नेत्याचे कुणीही नाव काढते. दादासाहेब नितीन साळुंखे यांचे जाहीर आभार देखील वार्ड क्रमांक चार च्या नागरिकांनी मानले आहेत. फेवर ब्लॉक बसवण्याचे काम गुमन आनंदा गावित मिस्तरी यांनी केले आहे. या कामाची पाहणी सरपंच नितीन साळुंखे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली असता काम समाधानकारक झाल्याचे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य बॉडी व समस्त ग्रामस्थ यांचे यासाठी मोठे योगदान लागले आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, यांचे जाहीर आभार* बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

💥💥 धक्कादायक

🟣 वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं गळफास घेऊन संपवलं जीवन; सांगलीतील […]

नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे बीट अंतर्गत केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.नंदुरबार…..सा पोलीस व्हिजन न्यूज…. नंदुरबार जिल्हा मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून चांगल्या दर्जाचे शिक्षण संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमधून व शासनमान्य खाजगी माध्यमिक शाळांमधून चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले जाते विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम या जिल्ह्यांमध्ये राबवले जातात. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. असाच एक शासकीय उपक्रम दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी ,नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदरदे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळोद केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा , खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्लास केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला . सदर कार्यक्रम आदिवासी भागात असल्याने प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर पारंपारिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे (माध्य.) होते.तर उद्घाटक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदनाताई वळवी (प्राथमिक) या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा यशवंत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी योजनाचे, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जि .प .सदस्य श्रीमती राजश्री गावित, नंदुरबार प. स.च्या उपसभापती रंजनाताई पवार, मा. जि. प .सदस्य विश्वनाथ वळवी, शेजव्याचे उपसरपंच मुन्ना वसावे,सिलवंत वाकोडे शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर, डॉ. सचिन गोसावी सुंदरदे बीट विस्तार अधिकारी.माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील,पिपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ, सुंदरदे केंद्राचे केंद्रप्रमुख लीलाधर देसले , परीक्षक म्हणून अमृत पाटील, प्रा.डाॅ. गिरीश पवार, प्रा. अरुप कुमार गोस्वामी,प्रा. प्रशांत देसले, प्रा. दीपक मगरे , पिंपळोद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख यादी उपस्थित होते.अधिकारी व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आदिवासी संस्कृतीनुसार ढोल वाद्यवाजवून शिबली नाचवून व शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी साडीचा पेहराव करून पुष्पांचा वर्षाव करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजापूर जि .प .शाळेच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन नृत्यातून सादर केले तर माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदरदे बीटचे विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रविण अहिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून उल्लास नवभारत साक्षरता अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे व सुंदरदे बीट चे तोंड भरून कौतुक करताना प्रविण अहिरे साहेब म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात उल्हास नवभारत साक्षरतेचा हा मेळावा अप्रतिम व पहिलाच असावा असा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातुन केला.प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनीही आपला मनोगतातून माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत होणाऱ्या नवभारत साक्षरता मेळाव्या मांडण्यात आलेल्या साहित्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील , राजश्री गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साक्षर विद्यार्थी व असाक्षर विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जि. प. मराठी शाळा उमर्दे बु || येथील विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य सादर केले तर, माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार लिखित व दिग्दर्शित साक्षरतेवर आधारित आपण पण साक्षर होऊ या यावर आधारित धमाल विनोदी नाटिका सादर करण्यात आली सदरील नाटकेमध्ये माध्यमिक शाळेचे उपशिक्षक विजय पवार, दीपक वळवी ,आनंदराव पवार, हरुण खा शिखलीगर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन धम्माल विनोदी नाटिका सादर केली. त्यानंतर शैक्षणिक साहित्य मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपशिक्षिका संगीता गोखले व लिपिक नेहा शर्मा यांनी साक्षरतेवर आधारित काढलेली रांगोळी सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले होते. तसेच सदरील मेळाव्यात उल्हास नवभारत साक्षरता वर आधारित शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य, विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती. या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे 18 , पिंपळोद केंद्राचे 17 असे एकूण 35 शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आली होती . आलेल्या अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले सदरील मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्य मधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदरदे, व्दितीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बु||, तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा, हरिचंद्र वसावे जि.प. मराठी शाळा तगाईपाडा, यांना देण्यात आला तर. उल्लास नवभारत साक्षरता गणित साहित्य मध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील, सुवर्णा भामरे जि.प. मराठी शाळा लोय, द्वितीय क्रमांक कपिला पतिंगे जि.प. मराठी शाळा शेजवे,तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाठ माध्यमिक विद्यालय उमरदे बु||, रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आला तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बाविस्कर जि प मराठी शाळा राजापूर, द्वितीय क्रमांक कविता बोरसे जि प मराठी शाळा रतनपाडा , तृतीय क्रमांक रवींद्र पाटील ,अरुणा साळवे जि प मराठी शाळा डाकणपाडा यांना देण्यात आला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार, विजय पवार यांनी केले तर आभार पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी मानले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेची उपशिक्षक विजय पवार दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिकलीगर, संजय बोरसे, आनंदराव पवार,संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, समीर वसावे,दिनेश पवार यादीने परिश्रम घेतले . सदरील उल्लस नव साक्षरता मेळाव्याला शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदरदे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्लास नवसाक्षरता साठी नेमून दिलेले स्वयंसेवक , परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.