जय जिजाऊमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.त्याठिकाणी पोलिस प्रशासनाकडून आंदोलन करत्यांच्या गावातील लोकांना लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला याचा निषेध महाराष्ट्रभर चालु आहे.मनोज जरांगे यांची खेडेकर साहेबांनी भेट घेऊन सर्व गावकऱ्यांशी,जखमी गावकर्यांशी संवाद साधला व सर्व जिल्हाभर आंदोलकांनवर दाखल केलेले गून्हे विनाअट व विना शर्त मागेघ्यावे मराठा तरूणांच्या भविष्याची राखरांगोळी होवू नये यासाठी जालना जिल्हाधीकारी पांचाळ साहेब यांच्याशी कायदेशीर बाबीवर चर्चा केली.यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि मा.पुरूषोत्तम खेडेकर साहेब,माजी आमदार रेखाताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज भाऊ आखरे,प्रा.डाॅ.सुदर्शन तारख,संतोष गाजरेसह ईतरांची उपस्थिती होती.

पिंपळनेरच्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा….. कर्म. आ.मा. पाटील कला,वाणिज्य आणि कै. आण्णासाहेब एन.के.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरा करण्यात आली. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के.डी. कदम, सेवानिवृत्त प्रा.डॉ.डब्ल्यू. बी शिरसाठ प्रा.एल. जे.गवळी प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे उपस्थित होते.प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा.एल.जे.गवळी म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन बहुआयामी शिक्षक होते जीवनात मानवी वर्तन कसे असावे.म्हणून त्यांच्या जीवनाकडे विद्यार्थ्यांनी बघावे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य के. डी.कदम म्हणाले प्रत्येक व्यक्ती लहान,मोठी गुरु असते कारण प्रत्येकाकडून शिकण्यासारखे असते चांगले ते आत्मसात करून आचरणात आणले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे यांनी केले.चेतना निकुंभ, राऊत सलोनी,पवार सागर,घाणेकर इंद्रायणी, या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.के.एन.वसावे यांनी मानले याप्रसंगी प्रा.के.आर. राऊत, डॉ. एस. पी. खोडके,प्रा.एम. व्ही.बळसाने प्रा. व्ही.जी.उगलमुगले प्रा.डॉ. वाय. एम. नांद्रे, डॉ.एस.एस.मस्के प्रा. डी.बी. जाधव प्रा. सी. एन. घरटे.प्रा. डॉ. ए.जी.खरात डॉ. एन.बी.सोनवणे प्रा. सूर्यवंशी, प्रा.वानखेडे,प्रा.वाघ, प्रा.देसले, प्रा.सोनवणे, प्रा. डॉ. प्रशांत बागुल, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते

शिक्षक दिन हा भारताचा गौरवदिन व्हावा

(राष्ट्र उभारणीसाठी शासन,शिक्षक,पालक, विद्यार्थी व प्रसारमाध्यम यांची भुमिका) शासन आणि शिक्षणज्या देशाची शिक्षणव्यवस्था मजबूत असेल […]

४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघे अडकले पोलिसांच्या जाळ्यातAugust 23, 2023…शिरोळ दि.२३ : पवित्र शिक्षण व्यवस्था आता पापेकरी ठरवली जाते आहे.शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजणारे काही शैक्षणिक संस्था आहेत.काही संस्था चांगल्या देखील आहेत .तेथील संस्था चालक शिक्षण महर्षी सुध्दा झाले.पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा एका संस्थेविरुध्द सापळा रचून ४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघांना जाळ्यात पकडले. शाळेचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील आणि शिपाई अनिल बाळासो टकले या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

Home  क्राईम Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या […]

विशेष लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत अटक

याबाबत वृत्त असे की,सखाराम कडु ठाकरे,विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, ( प्रक्रिया), धुळे अतिरिक्त कार्य. विशेष […]

डॉ.शंकर अंदानी यांच्या सेवाभावी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकार्ड मध्ये

अहमदनगर येथील सनदी लेखपाल सी ए ,डॉ.शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद लंडन […]