प्राचार्य बी.एस.पाटील यांचा– ना भुतो ना भविष्यती सहस्रचंद्र दर्शन सोहळा. कासारे, सा पोलीस व्हिजन धुळे…ता.17:- “वयाची आठ दशकं पुर्ण करुन 81 व्या वर्षांत पदार्पण करणारा एक तरुण, जो की, साक्री तालुक्याची एक अभ्यासु, दूरदृष्टी असलेलं, आपल्या कृती कार्यक्रमातुन समाजाला वैचारिक दिशा देणारं, शांत ,संयमी व तितकच परखड मत मांडून प्रबोधन करणारं व्यक्तीमत्व म्हणून ओळख सांगणारं, उभ्या उत्तर महाराष्ट्रातील असंख्य संवेदनशील मनांचे प्रेरणा श्रोत ठरलेले प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील यांचा आज सहस्रचंद्र दर्शन सोहळा, हाच मुळात एक नाविन्य घेवुन आपलं वेगळेपण सिद्ध करत, दिशा दर्शक ठरतो आहे”.असे प्रतिपादन उमावि चे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी व्यक्त केले.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील समृद्ध व्यक्तीमत्त्व प्राचार्य बी.एस.पाटील यांचा सहस्त्रचंद्रदर्शन गौरव सोहळा रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी साक्री येथील बालआनंद नगरीत पार पडला.त्यावेळी डॉ. ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी गौरव समितीचे अध्यक्ष व माजी सिव्हील सर्जन डॉ.जी.एन.मराठे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमविचे प्रथम कुलगुरु प्रा.डॉ.निंबा कृष्णा ठाकरे, उमविचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. के. बी. पाटील, माजी न्यायमूर्ती अॅड. जे.टी. देसले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे आदी मान्यवर उपस्थित होते.या गौरव सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दादासाहेब प्राचार्य बी.एस.पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली.तर बी.एस. पाटील यांच्या पत्नी सौ.रत्नमाला पाटील यांची मोतीचूर लाडुतुला करण्यात आली.गौरव समितीने जाहीर केल्याप्रमाणे सर्वांनीच या कार्यक्रमात पुस्तक भेट दिले हे विशेष.सदर ग्रंथ विविध शाळा, ग्रंथालयांना भेट देण्यात येणार आहेत.या गौरव सोहळ्यास आ.विजयकुमार गावीत, अमळनेर चे माजी आमदार बी.एस.पाटील, श्री.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळे संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, संचालक डॉ .पी.डी.देवरे, नाशिकचे कृष्णराव नेरे, श्रीमती.प्रमिलाबाई देसले, संजय देसले, शशिभूषण देसले यांचेसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.कासारेचे कलाकार भटू बेंद्रे याने बनवलेली सुबक बैलगाडी यावेळी सत्कारमूर्तींना देण्यात आली तसेच कलाशिक्षक राजन पवार यांनी त्यांच्या कुंचल्यातून साकारलेले प्राचार्य बी. एस. पाटील यांचे पेंटिंग याप्रसंगी प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी दोन विशेष अंकांचे व एका ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष प्रा.एल.जी. सोनवणे यांनी केले. कार्याध्यक्ष विजय भोसले यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी प्रमिलाताई गांगुर्डे, डॉ.दिलीप पाटील,सुभाष बोरसे, ऍड.जे.टी.देसले, प्रा.प्रकाश पाठक, डॉ.के.बी.पाटील, डॉ. जी.एन. मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. झेड.कुवर व रविंद्र भामरे यांनी केले.आभार विलास देसले यांनी मानले.यशस्वीतेसाठी गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ.जी.एन.मराठे, कार्याध्यक्ष विजय भोसले, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे,उपाध्यक्ष प्रा.एल.जी.सोनवणे, खजिनदार प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे, सचिव पी.झेड.कुवर,सहसचिव विलास देसले,सदस्य श्रीमती. प्रमिलाताई गांगुर्डे, इंजि.योगेश पाटील, प्रा.डॉ.अमित पाटील, डॉ. एन. डी.नांद्रे यांचेसह मुख्याध्यापक के.डी.सोनवणे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे, मुख्याध्यापक अनिल साळुंके, पर्यवेक्षक व्ही.एम.देवरे, प्रा. मनीषा पाटील, सुवर्णा देसले, लाडे मॅडम, धनश्री हिरे, विनोद शेवाळे, हंसराज देसले, सुनिल भदाणे, बी.एम.भामरे यांचेसह इंदवे, पेरेजपूर, कासारे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.