नंदुरबार येथे चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल निझर रोड नंदुरबार येथे दिनांक..17-2-2025 ते 22-02-2025 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ नंदुरबार…सा पोलीस व्हिजन धुळे.. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक, खाजगी प्राथमिक व माध्यमिक, आश्रम शाळा येथील शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार श्री.निलेश पाटील यांच्या स्वाक्षरीने सदर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे लेखी आदेश आहेत.त्या आदेशानुसार आज दिनांक 17 .2 .2025 वार सोमवार पासून दुसऱ्या टप्प्यातील हे प्रशिक्षण आता दिनांक 22-2-2025 पर्यंत सुरू झाले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चावरा इंग्लिश मीडियम स्कूल,निझर रोड,नंदुरबार येथे करण्यात आले. या प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी नंदुरबार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री जाधव वाय.पी. व व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री देसले सर कर्णकाळ सर, रावसाहेब पाटील,एन टी पाटील सर, तसेच सर्व सुलभक व लोणखेडा, पाचोरा बारी, कोपर्ली, भालेर ,सुंदरदे ,कुठली, पिंपळोद, धानोरा, खोंडामळी, शिंदे, रजाळे, येथील प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. सदर प्रशिक्षणामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी नवीन अभ्यासक्रमातील तंत्रज्ञान, सन 2020 पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अध्यापन करणारे शिक्षकांच्या पाया भक्कम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शिक्षकांना व्हावा यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शकांकडुन उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. असे नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर बेलन बि.एस. यांनी पोलीस व्हिजन प्रेस ला सांगितलेजेवणाची व्यवस्था व चहा पाण्याची व्यवस्था देखील या प्रशिक्षण स्थळी करण्यात आली आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे…. मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *