निसर्ग निवास स्काऊट- गाईड शिबिरातून विद्यार्थ्यांनी स्वयंम शीस्तीतून टिपलेत संस्कार मोती

विखरण- (प्रतिनिधी सा पोलीस व्हिजन धुळे)नंदुरबार जिल्ह्यातील श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयातील विद्यार्थी स्काऊट गाईड निसर्ग निवासी शिबिराचे आयोजन पावबा ऋषी मंदिर नाशिंदे येथे करण्यात आले.स्काऊट ध्वजारोहण नाशिंदे येथील पोलीस पाटील दिलीप भाईदास पाटील,मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजगीत व प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना आपली दैनंदिन दिनचर्या कशा प्रकारे करावी याचे नियोजन आपल्या प्रास्ताविकेतून स्काऊट शिक्षक डी.बी.भारती यांनी मांडले. उपस्थित स्काऊट गाईड यांनी मंदिर परिसरातील साफसफाई सह प्लास्टिक केरकचरा यांचे संकलन केले.व योग्य विल्हेवाट लावत नाशिंदे गावातील ग्राम स्वच्छता करून श्रमसंस्कार रुजवला.स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी तंबू उभारून आपल्या संघांचे कार्य निरीक्षकांना सांगितले.या निसर्ग निवास शिबिराला नंदुरबार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील, खोंडामळी केंद्राचे केंद्र प्रमुख आनंदराव करणकाळ,तंत्रस्नेही मनोज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.स्काऊट गाईड्सनी स्वतः बनविलेला स्वयंपाकात चविष्ट भाजी व भाकरी तयार केली. या शिबिरात स्काऊट गाईड यांनी आपल्या स्वयंशिस्तून, वर्तनातून माणिक,संस्कार मोती जणू टिपलेत असे दर्शन घडले. जमिनीवरीलविविध स्काऊट गाठी व बांधण्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रात्री शेकोटी पेटवून शेकोटी गीत,नियम,वचन विधी पार पाडण्यात आली.विविध देशभक्तीपर,भारतीय एकात्मतेवर,कृतीयूक्त गीते व खेळ स्काऊट शिक्षक डी.बी. भारती,एम.एस.मराठे गाईड शिक्षिका एस.एच.गायकवाड, डॉ.आर.आर.बागुल,ए.एस.बेडसे यांनी सादर केलेत. विविध स्काऊटिंग कौशल्यांचे उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, एम.डी.नेरकर यांनी दैनंदिन परीक्षण केले.शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके नाशिंदे येथील उपसरपंच सुखदेव दत्तु भील,प्रगतशील शेतकरी दिगंबर मुरलीधर पाटील,मुख्याध्यापक डी.डी.साळुंके व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक व्ही.बी.अहीरे यांनी मानले.शिबिर यशस्वीते साठी डी.बी.पाटील,एच.एम. खैरनार,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले. बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *