नंदुरबार येथील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण चा समारोप संपन्न. नंदुरबार… दिनांक.15/2/2025 प्रतिनिधी सा पोलीस व्हिजन धुळे…. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. त्यातील पहिला टप्पा इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक यांच्यासाठी सदर प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाच दिवसांसाठी हे प्रशिक्षण नंदुरबार तालुका स्तरीय प्रशिक्षण कृष्णा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल पातोंडा रोड नंदुरबार व एम के डी नवापूर रोड नंदुरबार या दोन ठिकाणी सुरू होते. या प्रशिक्षणाची आज शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत अंतिम प्रशिक्षण घेण्यात आले. एकूण कृष्णा इंटरनॅशनल स्कूल या केंद्रावर 350 शिक्षक तर एमकेडी नवापूर रोड येथे 300 शिक्षकांनी सदर प्रशिक्षणाचा आज लाभ घेतलेला आहे. या प्रशिक्षणाचा समारोप आज पंचायत समिती नंदुरबार चे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील यांच्या शिक्षकांना शुभेच्छा संदेशासह त्यांच्या मार्गदर्शनातून शिक्षण विस्तार अधिकारी श्री वाय पी जाधव ,पंचायत समिती नंदुरबार,श्री.एस.एन.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नंदुरबार गट समन्वयक बीआरसी नंदुरबार, श्री आर आर पाटील, श्रीमती, एस व्ही चौधरी, श्रीमती के आर पाटील, श्रीमती एन बी देशमुख, प्रशिक्षण सहाय्यक गट साधन केंद्र नंदुरबार, श्री नरेंद्र पाटील तज्ञ मार्गदर्शक, श्री राजपूत भगवान, तज्ञ मार्गदर्शक, श्री वाडेकर सर तज्ञ मार्गदर्शक, श्री उमेश पाटील सर तज्ञ मार्गदर्शक, श्री देसले सर तज्ञ मार्गदर्शक, यांच्या उपस्थितीत सदर प्रशिक्षणाचा निरोप समारंभ झाला. यावेळी शिक्षकांनी प्रशिक्षणाबाबत आलेले अनुभव चांगल्या पद्धतीने मांडले. प्रशिक्षण स्थळी व्यवस्था प्रशासनाने चांगल्या पद्धतीने ठेवण्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी तज्ञ मार्गदर्शनाचे आभार व्यक्त करून त्यांचा पुष्पगुच्छ पुस्तक व पेन देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित प्रशासकीय सर्व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणासाठी शिक्षकांना काही थोड्याफार व्यवस्था करण्यामध्ये उनिवा राहिल्या असतील तर त्या पुढील प्रशिक्षणामध्ये सुधारण्यात येतील असे आपल्या मनोगत शिक्षण विस्तार अधिकारी श्री एस एन पाटील यांनी आश्वासन दिले. या प्रशिक्षणासाठी दैनंदिन पाच दिवसांपासून शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नंदुरबार चे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री वाय पी जाधव यांनी संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची व्यवस्था चोख रखण्यामध्ये व शिस्तबद्ध पद्धतीने हे प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. तसेच प्रशिक्षण सहाय्यक श्री आर आर पाटील यांनी संपूर्ण उपस्थितीबाबत रोजचे अपडेट ठेवण्यासाठी मोठी जबाबदारी घेतली. सदर प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्याच्या भावना यावेळी प्रत्येक शिक्षकाने आपल्या मनोगत आतून बोलून दाखवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भास्कर धनगर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वर भाई यांनी केले. बातमीपत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे*