विखरण :- शाळा म्हटली की त्या ठिकाणी विविध उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध गुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त आनंददायी शिक्षण देण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. वर्षभर विद्यार्थी आपल्या शाळेतून विविध विषयाचे अध्ययन करत बोर झालेले असतात. त्यांना त्यांच्या अंगातील असलेल्या विविध कलागुणांना वाव देता यावा यासाठी शाळांमध्ये सांस्कृतिक विभाग देखील असतो. याच सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्षभरातून एक स्नेहसंमेलन शाळांमध्ये राबवले जाते. असेच स्नेहसंमेलन नंदुरबार तालुक्यातील अतिशय सुंदर व सुसज्ज अशा परिसरातील एक आदर्श शाळा म्हणजे विखरण येथील आहे.सदर शाळा नंदुरबार तालुक्यातील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाचे.श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन एम. व्ही.टू.संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी विविध नाट्य व नृत्य संगीत कलांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विखरण येथील माजी सरपंच बापू विश्राम पाटील,पोलीस पाटील ॲड.दीपमाला प्रकाश पाटील, नाशिंदा येथील पोलीस पाटील, दिलीप भाईदास पाटील बोराळा येथील सरपंच, देविदास पुना पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुरेश लक्ष्मण साळुंके, ईश्वर शिवाजी मराठे,दिलीप नागो पाटील,ज्येष्ठ नागरिक मधुकर दोधू पाटील,
साई श्रद्धा ऑर्केस्ट्राचे लक्ष्मिकांत जाधव , विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे व नटराजन शिल्पाचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांच्या स्वागत सन्मानानंतर ‘मेरे घर राम आये है’ या सामुहिक नृत्याने भक्तीमय वातावरण निर्माण केले.विविध देशभक्तीपर, गुजराती,दक्षिण भारतीय, राजस्थानी नृत्यांसह कु.बिरारेच्या मराठमोळ्या लावणीने प्रेक्षकवर्गाच्या डोळ्यांचे पारणे फेडले.विविध सामुहिक व एकल नृत्यांसह मराठी,हिंदी व अहिराणी नाटीकांनी हास्याचे फवारे उडविले.प्रबोधनपर नारी शक्तीचा जागर,चला हवा येऊ द्या मालिकेतील गुरुजींची डकमाल,साहेबांची धमाल, विद्यार्थी मालामाल एकांकी, पाणीपुरी वाल्याची कथा एकपात्री,खानदेशनं लगीन विनोदी नाटीका,कराओके ट्रॅकवरील गीते,अशा भरगच्च कार्यक्रमांच्या रेलचेलीने मध्यरात्रीपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.बी.भारती, डॉ.आर.आर.बागुल यांनी तर आभार सी.व्ही.नांद्रे यांनी मानले.प्रकाश योजना एम.डी. नेरकर,ध्वनी योजना वाय.डी. बागुल,नेपथ्य व वेशभूषा एस.एच.गायकवाड,ए.एस.
बेडसे,व्ही.बी.अहिरे,एम.एस.
मराठे,रंगमंच व बैठक व्यवस्था कामी डी.बी.पाटील,एच.एम. खैरनार,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.विखरण,बोराळा,खापरखेडा,नाशिंदा, खोंडामळी,शिंदगव्हाण या गावातील, पंचक्रोशीतून अबालवृद्ध प्रेक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.


