नंदुरबार येथे शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण २.० मध्ये शिक्षकांकडून तिसऱ्या दिवशी उत्साहात गट कार्य सादरीकरण झाले. ✍️ दांडी बहाद्दर शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस जारी ✍️ नंदुरबार … प्रतिनिधी..(सा.पोलीस व्हिजन धुळे ) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून संदर्भ दिनांक जावक क्रमांक पंचायत समिती नंदुरबार शिक्षण प्रशिक्षण /1275 /2025 अन्वये नंदुरबार जिल्हा गटशिक्षणाधिकारी श्री.निलेश पाटील यांच्या स्वाक्षरीने इयत्ता सहावी ते आठवी साठी केंद्र निहाय प्राथमिक व खाजगी शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा, आश्रम शाळा येथील शिक्षकांना सदर प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश होते. त्यानुसार सुंदरदे,भालेर, व इतर केंद्र गट मधील शिक्षकांचे हे प्रशिक्षण दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते दिनांक.15/ फेब्रुवारी/2025 असे एकूण पाच दिवसाचे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणाचा आजचा तिसरा दिवस होता.सध्या हे प्रशिक्षण कृष्णा इंटरनँशनल इंग्लिश मिडीयम स्कूल पातोंडा ता.जि.नंदुरबार येथे एकुण .350 प प्रशिक्षणार्थी व एम.के.डी नवापुर रोड, नंदुरबार येथे एकूण 300 प्रशिक्षणार्थी या प्रथम टप्प्यातील प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या केंद्रात साधारण इयत्ता पहिली ते पाचवी,सहावी ते आठवी पर्यंत अध्यापन करणारे शिक्षक शिक्षिका हे प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. जे शिक्षक हे प्रशिक्षण सुरू असताना मध्येच पूर्वपरवानगी न घेता जर सोडून गेले असतील अशांना तात्काळ गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील यांनी त्यांच्या स्वाक्षरीने सायंकाळी त्यांच्या शाळेवर संबंधित प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना लिखित कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यामुळे दुसऱ्या दिवसापासून या प्रशिक्षणामधून कोणताही शिक्षक प्रशिक्षण सोडून जाण्याची त्यांनी हिंमत केली नाही. ही एक शिस्त लावण्यामध्ये गटशिक्षणाधिकारी यशस्वी झाले आहेत.सदर प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण अधिकारी,श्री प्रवीण अहिरे , प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी, गटशिक्षणाधिकारी श्री.निलेश पाटील, पंचायत समिती नंदुरबार,श्री. वाय. पी .जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती नंदुरबार,श्री.एस.एन.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नंदुरबार गट समन्वयक बीआरसी नंदुरबार,तसेच डायट चे प्राचार्य व सर्व स्टाफ, तसेच सुंदरदे गट केंद्र प्रमुख श्री देसले बापु यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य, श्री.आर.आर.पाटील, तज्ञ साधन व्यक्ती प्रशिक्षण सहाय्यक गटसाधन केंद्र नंदुरबार, श्रीमती एस.व्ही चौधरी श्रीमती के आर पाटील श्रीमती एन बी देशमुख प्रशिक्षण सहाय्यक गटसाधन केंद्र नंदुरबार, यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.या प्रशिक्षणासाठी चारकुल साठी एकुण 16 तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली आहे.पैकी तज्ञ मार्गदर्शक म्हणून माध्यमिक शिक्षक पळाशी येथील तज्ञ मार्गदर्शक श्री नरेंद्र पाटील सर,श्री.भगवान राजपूत सर,श्री कल्पेश देवरे सर, हितेश वाडेकर सर,उदय प्रकाश पाटील सर हे अत्यंत चांगल्या पध्दतीने सदर प्रशिक्षणाला हजर असलेल्या प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण बाबत चांगले मार्गदर्शन होत आहे. या प्रशिक्षणाचा आजचा तिसरा दिवस असल्याने प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षिका यांना आज गट पाडण्यात आले असून त्यांना गटकार्य प्रत्येक विषयाचे देण्यात आले होते. यात प्रत्येक गटातील शिक्षक शिक्षकांनी आपल्या विचारशक्तीने विद्यार्थ्यांना घटक उपघटक व त्यातील ध्येय साधने यांचा वापर कशा पद्धतीने करण्यात येतो त्यातून त्यांची शिक्षण घेण्याची प्रगती कशी उंचावेल यासाठी प्रात्यक्षिक सादर विविध विषयातील प्रात्यक्षिक तक्ते तयार करून शालेय साहित्य तयार करून त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले.या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024, गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रस्तावना व संरचना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षेत्र क्रमांक एक ते सहा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा परिशिष्ट एक ते आठ, समता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती, क्षमता आधारित प्रश्न प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य,विचार प्रवर्तक प्रश्न, गटकार्य अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती, समग्र प्रगती पत्र संकल्पना व पार्श्वभूमी, समग्र प्रगती पत्रक स्तर रोहन स्वरूप, या अभ्यासक्रमावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण डिजिटल स्क्रीन बोर्ड वरून देण्यात येत आहे. विविध नवीन शैक्षणिक साधने यातून सदर प्रशिक्षण घेण्याचा शासनाचा मानस असून प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला किमान लिहिता वाचता येणे बंधनकारक आहे. आधुनिक काळातील शिक्षण हे त्या पद्धतीनुसार बदलले पाहिजे अध्यापन क्रिया पद्धती या बदलल्या पाहिजेत सामाजिक व आजच्या चालू धरतीवरील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे ही मुख्य संकल्पना या नवीन राष्ट्रीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. संख्यात्मक अधिक गुणात्मक बरोबर शिक्षकांचा अभिप्राय म्हणजेच मूल्यमापन होय. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्यरित्या झाले पाहिजे. विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेत अमूर्त बदल होण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण दिले गेले पाहिजे यावर विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर जोर दिला जात आहे. इयत्ता सहावी मध्ये या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षण देण्याची पद्धत रुजवली जात आहे. जेणेकरून भविष्यात प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिक तयार होऊ शकतो. उत्तम शेतकरी देखील तयार होऊ शकतो. पूर्वी ग्रामीण भागातील बारा बलुतेदार पद्धतीनुसार सर्वांगीण कामे होत होती. व्यवसाय होत होते. त्याच धर्तीवर आज विद्यार्थ्याला व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून इयत्ता सहावी मध्ये त्याचा कल ओळखून त्याच व्यावसायिक शिक्षण आले असल्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रशिक्षण उत्तम पद्धतीने सुरू असल्याने शिक्षक शिक्षिका यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे.मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके, धुळे