धुळ्यात शिक्षक दरबार फार वर्षांनी गाजला!!!शिक्षक आमदार दराडेंमुळे शिक्षकांना मिळाले न्याय मागण्याचे हक्काचे व्यासपीठ* धुळे…..सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… धुळे येथे जीआर सिटी हायस्कूल येथील सभागृहात 30 जानेवारी 2025 रोजी, शिक्षक दरबार चे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात विशेषता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांतील कर्मचारी बदलीचा घेतलेला निर्णय शिक्षक हिताविरुद्ध असल्याने त्यास शिक्षक संघटनांचा विरेाध होतो आहे. त्यामुळे कर्मचारी बदलीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे; परंतु ब्लॅक लिस्टमधील केंद्रांसाठी हा निर्णय लागू राहील, असेही यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांचेकडून सांगण्यात आले.धुळे जिल्ह्यातील काही संस्थांमध्ये अनेक शिक्षकां च्या विविध समस्या, मागण्या आणि त्यांची पूर्तता होत नाही यासाठी प्रचंड नाराजी आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी असो की निवड श्रेणी असो या शासनाकडून शिक्षकांना मिळत असतात. शासन शिक्षकांचे वेतन करत असते. तरीदेखील काही संस्थेतील चमकोगिरी करणारे अशा प्रामाणिक शिक्षकांच्या मागण्या व त्यांचे हक्काचे लाभ मिळू नयेत यासाठी आपल्या संस्था चालकांना अशा कर्मचाऱ्यांबद्दल चुकीची माहिती पोहोचवून त्यांची एक प्रकारे हानीच करत असतात.ही काही माणसं संस्थाचालकांशी लुडूबुडु करून आपले स्वतःचे मात्र उल्लू सरळ करून घेत असतात. आपल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींना याच संस्थांमध्ये नोकरीला लावून घेण्याचा प्रकार सर्व नियम धाब्यावर बसवून करून घेत असतात. त्यांचा पगार देखील शासनाकडून सुरू करून घेण्यात आलेला आहे. हे भयानक वास्तव आहे. त्यांना पदभरती करताना नेमक्या कोणत्या वर्तमान पत्रात केव्हा जाहिरात निघाली हे देखील गुपित ठेवले जाते. त्यांना ज्या शाळेत लिपिक म्हणून नियुक्ती दिली जाते त्यांना मात्र त्या शाळेत कामावर देखील पाठवण्यात येत नाही. त्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यासाठी मस्टर घरी आणले जाते आणि त्यावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या जातात. त्यांना घरी बसून पगार मानधन सुरू करून देण्यात आले आहे. असे अनेक प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.त्यांचा शोध घेऊन त्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत.एकीकडे शासनाची नोकर भरती बंद असताना बोगस पदभरत्या करून हे संस्थेला देखील अडचणीत आणण्याचा प्रकार करत असतात .या अनेक समस्यांना स्थानिक जिल्हास्तरावर न्याय देता यावा या उदात्त न्याय भावनेतून शिक्षकांच्या साठी ठामपणे पाठीशी उभे राहणारे नाशिक शिक्षक मतदारसंघ चे धडाकेबाज आमदार किशोर दराडे यांनी धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्ह्यासाठी 30 जानेवारी 2025 रोजी थेट शिक्षक दरबार चे आयोजन केले होते. या दरबारास माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे चे मनीष पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी जि.प.धुळे डॉ किरण कुंवर, वेतन पथक अधीक्षक, शर्मा, तसेच विविध संघटना प्रमुख या शिक्षक दरबारी उपस्थित होते. गुरुवारी जीआर सिटी हायस्कूल धुळे येथील सभागृहात हा शिक्षक दरबार लावण्यात आला होता. शिक्षकांच्या विविध न्यायालयीन प्रकरणांची दखल शिक्षण विभाग घेत नाही, अनुकंप तत्त्वावरील पदभरती किंवा नियुक्त्या काही संस्था देत नाहीत, काही ज्येष्ठ शिक्षक यांना मुख्याध्यापक पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येते. सेवा जेष्ठता डावळून आपल्या मर्जीतील मुख्याध्यापक नियुक्त केला जातो. आणि शिक्षण अधिकारी देखील अशांना मंजुरी देतात.जे शिक्षक 20 टक्क्याच्या नियमात निवड श्रेणीसाठी ग्राह्य ठरतात, अशांना निवड श्रेणी दिली जात नाही. यावर शिक्षकांची प्रचंड नाराजी होती. बेकायदेशीर बदल्या शिक्षकांकडून आर्थिक देवाण-घेवाण व्हावी यासाठी केल्या जातात. अशा अनेक समस्या व त्यांच्यावर चर्चा करून शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी तात्काळ शिक्षकांना न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जागीच सूचना केल्या या दरबारात असे दिसून आले की शिक्षकांची संस्थाचालकांवर नाराजी नाही. त्या संस्थेतील काही शिक्षक,मध्यस्थितांच्या आडमुठी पणा मुळे काही संस्थेतील शिक्षकांना न्याय मिळत नाही. असे चित्र समोर दिसून आले. काही संघटनेचे प्रमुख जे स्वतःला शिक्षक नेते म्हणून समजून घेतात अशांच्याच शाळेतील शिक्षक त्या ठिकाणी न्याय मागणीसाठी या दरबारात विशेष करून उपस्थित होते. अनेक शिक्षकांकडून असे बोलले गेले की, शिक्षक दरबाराचे व्यासपीठ हे पवित्र मानले जाते. कारण त्या व्यासपीठावर शिक्षकांना जागीच न्याय देण्यासाठी हा दरबार लावण्यात आलेला असतो. मग अशा व्यासपीठावर ज्या शिक्षकांवर अन्याय केलेला असतो त्याच शाळेतील संघटना प्रमुख अशा न्यायदेवतेच्या व्यासपीठावर कसा बसू शकतो?? अशी चर्चा रंगलेली होती. अनेक शिक्षकांनी आपल्या समस्या त्यांना दोन दोन अडीच अडीच वर्ष न्याय मिळत नाही त्यांच्या वेदना त्यांनी शिक्षक आमदार दराडे यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना आशा एवढीच होती की हा आपला शिक्षकांचा दरबार आहे येथेच न्याय मिळेल. म्हणून ते आमदार दराडे हे कोणत्या पक्षाचे आमदार आहेत? हा विचार न करता आपले हक्काचे शिक्षक आमदार आहेत आणि ते न्याय देण्याचे काम करणारे व्यक्तिमत्व आहे या चांगल्या विचारातून हे शिक्षक या दरबारात न्याय मागण्यासाठी आलेले होते. आपल्या भाषणात आमदार दराडे यांनी देखील मी कोणत्याही एका पक्षाचा आमदार नाही मी माझ्या शिक्षकांचा शिक्षक आमदार आहे आणि माझे प्रामाणिक कर्तव्य आहे की मी या माझ्या शिक्षकांना न्याय देईल हे त्यांनी ठामपणे मांडले. या ठिकाणी ज्या शिक्षकांच्या समस्या होत्या त्यांना आठ दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आदेश देखील शिक्षक आमदार दराडे यांनी केले आहेत. वेळ पडल्यास संबंधित संस्थाचालक, संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवर देखील ते बोलून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. काही विद्यमान मुख्याध्यापक यांना रिवाईज करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.त्यांची चौदा महिन्यांची पगार बिले टाकण्यात आलेली नाहीत.त्यामुळे ते पगारापासून वंचित असल्याची देखील येथे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. आता फक्त त्यांना न्याय केव्हा आणि कसा मिळतो यावर या शिक्षक दरबाराचे पुढील भविष्य अवलंबून असणार आहे. एकंदरीत धुळे जिल्ह्यातील हा शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा अखेर गाजला अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *