भूमापन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात अटकधुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले

धुळे क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन – (सौ.प्रतिभा साळुंके) … सध्या कोणत्याही कार्यालयात जाऊन आपण सामान्य जनता म्हणून सहज काम होऊन जाईल यासाठी जात असतो. मात्र या कार्यालयातील काही पैशांची चिरीमिरी घेऊन काम करून देणारे लाच घेतल्याशिवाय काम करतच नाही अशा प्रकारचा राजरोसपणे प्रकार सुरू आहे. सामान्य जनतेला या लाचखोरांनी वेठीस धरून त्यांची काम होऊ देणार नाहीत अशीच भूमिका निभावत असतात. लाचेचे अनेक प्रकार आहेत काही शाळा कॉलेजांमधून देखील शिक्षण विभागातील काही अधिकारी शाळांच्या भेटींसाठी किंवा या नात्या कारणांनी काही मुख्याध्यापक यांच्या वतीने किंवा त्यांच्या पंटरांच्या वतीने शिक्षकांकडून देखील पैसे जमा करून तो थेट अधिकारी पर्यंत पोहोचवण्याचा मार्ग केलेला अशा लाचखोरांना तर खरे ठेचून काढले पाहिजे. असाच लाचखोरीचा प्रकार धुळे महानगरीत घडला.धुळे शहरातील भूमापन अधिकाऱ्याला दहा हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी एका माझी भूम आपण अधिकाऱ्याकडूनच लाचेची मागणी करत होता. त्यामुळे या प्रकरणात विद्यमान अधिकाऱ्याला माजी अधिकाऱ्याने झटका दिला आहे.लोकसेवक भास्कर गंगाधर वाघमोडे, नगर भुमापन अधिकारी, धुळे यांनी तक्रादार यांचेकडे २०,०००/- रुपयांची मागणी करुन १०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना
रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्राररदार हे नगर भुमापन अधिकारी या पदावर नगर भुमापन कार्यालय, धुळे येथुन सन २०१४ मध्ये सेवा निवृत्त झाले आहेत तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे महिंदळे, स.नं. १२८/ २ मध्ये प्लॉट नं.२ क्षेत्र १५५ चौ.मी. दि.२३१२.२०२४ रोजी खरेदी केला आहे. सदर फ्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र चुकीने १८५.२० चौ.मी. ची नोंद झाली असल्याने सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवर खरेदी खतान्वये नाव लावण्यासाठी अडचण येत असल्याने मिळकत पत्रिकेवरील कराची दुरूस्ती करून मिळणे करीता मुळ मालक यांनी नगर भुमापन अधिकारी, धुळे यांच्याकडे अर्ज केला होता. सदर अर्जीवर कार्यवाही होवुन नगर भुमापन अधिकारी भास्कर वाघमोडे यांनी सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने लागलेल्या क्षेत्राची दुरुस्ती करण्याबाबत कार्यालयीन आदेश काढले आहेत. परंतु सदर आदेशान्वये मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती न झाल्याने तक्रारदार हे वेळोवेळी धुळे नगर भुमापन कार्यालयात जावुन नगर भुमापन अधिकारी भास्कर वाघमोडे व परिक्षण भुमापक हर्षल खोंडे यांची भेट घेऊन पाठपुरावा करीत होते.त्या दरम्यान नगर भुमापन अधिकारी वाघमोडे
यांनी तक्रारदार यांचेकडुन १०,०००/- रुपये घेतले होते.त्यानंतर तक्रारदार हे धुळे नगर भुमापन कार्यालयात त्यांच्या कामाबाबत विचारपुस
करण्याकरीता गेले असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम परिक्षण भुमापक खोंडे यांना देण्यास सांगितल्याची दि. १ २.०१.२०२५ रोजी तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे परिक्षण भुमापक हर्षल खोंडे यांचेकरीता १०,० ००/ – रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर आज दि. २३.०१.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडुन १०,०००/ – रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचेविरुष्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुर आहे.सदरची सापळा कारवाई मा. शमिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, नाशिकपरिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधी्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे,
संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, अशांनी केली आहे. लाचखोरीची कुणी मागणी करत असेल तर साप्ताहिक पोलीस व्हिजन सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी उभा आहे. लाचेची मागणी करणाऱ्यांची थेट तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करावी असे देखील आवाहन साप्ताहिक पोलीस व्हिजनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *