याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस विजय चव्हाण (रा.सुभाष चौक अमळनेर ) हा पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत होता. त्याच्या पत्नीचे मामेभावासोबत विवाहबाह्य सबंध होते. त्यात ते अडथडा ठरत असल्याने त्याची हत्या करण्याची योजना त्याची पत्नी व तिचा प्रियकर यांनी आखली होती. विजय चव्हाण (रा.सुभाष चौक अमळनेर ) हे घनसोली येथे वास्तव्यास होते.31 डिसेंबर मंगळवारी त्यांना साप्ताहिक सुटी होती.त्याच रात्री त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी 1 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळा ते घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता. मात्र हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवत याबाबत रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली.व त्यावरून मारेकऱ्यांचा तपास सुरू करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पोलिसाची हत्या झाल्याने संपूर्ण पोलीस दल कामाला लागले होते. हत्या कोणी केली व का केली हे स्पष्ट होत नव्हते.मात्र मयत विजय चव्हाण यांच्या गुगल पे वरून अंडा भुर्जी हातगाडीवर 24 रुपयांचे ऑन लाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. त्यांनी हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेव्हणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेव्हणा व पत्नीचा मामेभाऊ याने दारू पाजली.व पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांना केला. विवाहबाह्य सबंधातून रेल्वे पोलीस विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.आता याचा तपास पोलीस कसून करत आहे.
