शेवाळी येथे गल्लीत फेवर ब्लॉग बसवण्याचे काम ग्रामपंचायत कडुन सुरू सरपंच नितीन साळुंके यांचे नागरीकांकडुन कौतुक. धुळे……सा पोलीस व्हिजन धुळे प्रतिनिधी…. शेवाळी हे गाव नागपूर सुरत महामार्ग वर बसलेले गाव असून साक्री तालुक्यातील हे गाव विविध अष्टपैलू नेतृत्वाने नावाजलेले आहे. या गावात शासकीय अधिकारी, शिक्षक, वकील, इंजिनियर ,डॉक्टर, पत्रकार,सदन आधुनिक शेती करणारे शेतकरी, ड्रायव्हर गाडी मालक, इंजिनियर राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांचे गांव म्हणून ओळखले जाते. तिथे पूर्वी मातीची घरे असलेले छोटेसे टुमदार गाव होते ते आता शहरीकरणाच्या सुसंस्कृतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. सिमेंट काँक्रीट ची घरे बंगले या गावात आता दिसू लागली आहेत. ग्रामपंचायत या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. संपूर्ण गावामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक गल्लीमध्ये फेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्या जात आहेत. वॉटर सप्लाय च्या नियोजनातून आता एक दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये रस्त्यांची समस्या होती. ती जागृत व पारदर्शकपणे सर्वांची कामे करणारे राजकीय व्यक्तिमत्व दादासाहेब नितीन साळुंके सरपंच यांनी मनावर धरून स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून वार्ड क्रमांक चार मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे वर फेवर ब्लॉक बसवून सुंदर रस्ते बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम करून दिले आहे. यासाठी साप्ताहिक पोलीस व्हिजन ने देखील दखल घेतली आहे. या गल्लीमध्ये नेहमी पाणी वाहत असताना दिसत होते त्यातून अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होत होता. ही समस्या दादासाहेब नितीन साळुंखे यांच्या कानावर टाकल्यावर त्यांनी तात्काळ या गल्लीत फेवर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण देखील केले आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये विद्युत रोषणाई देखील चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने करून दिली आहे. चांगले कार्य करणाऱ्या राजकीय नेत्याचे कुणीही नाव काढते. दादासाहेब नितीन साळुंखे यांचे जाहीर आभार देखील वार्ड क्रमांक चार च्या नागरिकांनी मानले आहेत. फेवर ब्लॉक बसवण्याचे काम गुमन आनंदा गावित मिस्तरी यांनी केले आहे. या कामाची पाहणी सरपंच नितीन साळुंखे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली असता काम समाधानकारक झाल्याचे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य बॉडी व समस्त ग्रामस्थ यांचे यासाठी मोठे योगदान लागले आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, यांचे जाहीर आभार* बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 35;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *