नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे बीट अंतर्गत केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.नंदुरबार…..सा पोलीस व्हिजन न्यूज…. नंदुरबार जिल्हा मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून चांगल्या दर्जाचे शिक्षण संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमधून व शासनमान्य खाजगी माध्यमिक शाळांमधून चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले जाते विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम या जिल्ह्यांमध्ये राबवले जातात. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. असाच एक शासकीय उपक्रम दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी ,नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदरदे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळोद केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा , खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्लास केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला . सदर कार्यक्रम आदिवासी भागात असल्याने प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर पारंपारिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे (माध्य.) होते.तर उद्घाटक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदनाताई वळवी (प्राथमिक) या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा यशवंत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी योजनाचे, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जि .प .सदस्य श्रीमती राजश्री गावित, नंदुरबार प. स.च्या उपसभापती रंजनाताई पवार, मा. जि. प .सदस्य विश्वनाथ वळवी, शेजव्याचे उपसरपंच मुन्ना वसावे,सिलवंत वाकोडे शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर, डॉ. सचिन गोसावी सुंदरदे बीट विस्तार अधिकारी.माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील,पिपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ, सुंदरदे केंद्राचे केंद्रप्रमुख लीलाधर देसले , परीक्षक म्हणून अमृत पाटील, प्रा.डाॅ. गिरीश पवार, प्रा. अरुप कुमार गोस्वामी,प्रा. प्रशांत देसले, प्रा. दीपक मगरे , पिंपळोद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख यादी उपस्थित होते.अधिकारी व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आदिवासी संस्कृतीनुसार ढोल वाद्यवाजवून शिबली नाचवून व शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी साडीचा पेहराव करून पुष्पांचा वर्षाव करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजापूर जि .प .शाळेच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन नृत्यातून सादर केले तर माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदरदे बीटचे विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रविण अहिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून उल्लास नवभारत साक्षरता अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे व सुंदरदे बीट चे तोंड भरून कौतुक करताना प्रविण अहिरे साहेब म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात उल्हास नवभारत साक्षरतेचा हा मेळावा अप्रतिम व पहिलाच असावा असा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातुन केला.प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनीही आपला मनोगतातून माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत होणाऱ्या नवभारत साक्षरता मेळाव्या मांडण्यात आलेल्या साहित्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील , राजश्री गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साक्षर विद्यार्थी व असाक्षर विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जि. प. मराठी शाळा उमर्दे बु || येथील विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य सादर केले तर, माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार लिखित व दिग्दर्शित साक्षरतेवर आधारित आपण पण साक्षर होऊ या यावर आधारित धमाल विनोदी नाटिका सादर करण्यात आली सदरील नाटकेमध्ये माध्यमिक शाळेचे उपशिक्षक विजय पवार, दीपक वळवी ,आनंदराव पवार, हरुण खा शिखलीगर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन धम्माल विनोदी नाटिका सादर केली. त्यानंतर शैक्षणिक साहित्य मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपशिक्षिका संगीता गोखले व लिपिक नेहा शर्मा यांनी साक्षरतेवर आधारित काढलेली रांगोळी सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले होते. तसेच सदरील मेळाव्यात उल्हास नवभारत साक्षरता वर आधारित शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य, विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती. या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे 18 , पिंपळोद केंद्राचे 17 असे एकूण 35 शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आली होती . आलेल्या अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले सदरील मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्य मधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदरदे, व्दितीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बु||, तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा, हरिचंद्र वसावे जि.प. मराठी शाळा तगाईपाडा, यांना देण्यात आला तर. उल्लास नवभारत साक्षरता गणित साहित्य मध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील, सुवर्णा भामरे जि.प. मराठी शाळा लोय, द्वितीय क्रमांक कपिला पतिंगे जि.प. मराठी शाळा शेजवे,तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाठ माध्यमिक विद्यालय उमरदे बु||, रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आला तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बाविस्कर जि प मराठी शाळा राजापूर, द्वितीय क्रमांक कविता बोरसे जि प मराठी शाळा रतनपाडा , तृतीय क्रमांक रवींद्र पाटील ,अरुणा साळवे जि प मराठी शाळा डाकणपाडा यांना देण्यात आला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार, विजय पवार यांनी केले तर आभार पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी मानले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेची उपशिक्षक विजय पवार दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिकलीगर, संजय बोरसे, आनंदराव पवार,संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, समीर वसावे,दिनेश पवार यादीने परिश्रम घेतले . सदरील उल्लस नव साक्षरता मेळाव्याला शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदरदे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्लास नवसाक्षरता साठी नेमून दिलेले स्वयंसेवक , परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.