धुळे…..सीआरपीएफ जवान शेखर गवई यांच्या कार्याचा लेखाजोखा…….सा.पोलीस व्हिजन, धुळे … जिल्हा अकोला तालुका बाळापूर येथील रहिवासी तथा सीआरपीएफ जवान शेखर दादाराव गवई राहणार मांडवा बुद्रुक यांनी कर्तव्यावर असताना उत्कृष्ट शौर्य कामगिरी केली त्याबद्दल त्यांचा अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे प्रशस्तीपत्र देऊन उचित सन्मान करण्यात आला. दि. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी कुलगाम, जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) श्री शेखर दादाराव गवई, रा. मांडवा बु, पोस्ट. बटवाडी, ता.बाळापूर, जिला. अकोला यानी उत्कृष्ट शौर्य, धाडस आणि उच्च दर्जाच्या कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले. त्याबद्दल त्याना माननीय राष्ट्रपतींनी पोलीस शौर्य पदक प्रदान केले आहे. श्री शेखर गवई यांना पोलीस शौर्य पदक देण्यात आले आहे. दिनांक ११ फेब्रुवारी २०१७ रोजी कमांडंट १८ बटालियन सीआरपीएफ यांना दहशतवाद्यांच्या हालचालीच्या सूचना आल्या. आणि त्यांनी तत्काळ आपले दोन शूर जवान कॉन्स्टेबल मुकेश कुमार आणि कॉन्स्टेबल शेखर दादाराव गवई यांना दहशतवाद्यांचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. दरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरूच ठेवला होता. घटनास्थळी लष्कराचा कायदा व सुव्यवस्थेचा घटक तैनात असल्याने कोणतीही हालचाल घेण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरीने करावी लागत असे. कॉन्स्टेबल मुकेश कुमार आणि कॉन्स्टेबल शेखर दादाराव गवई यांच्यासमोर दोन दहशतवादी होते, पण गोळीबारात जवानांची उपस्थिती त्यांच्या हालचालीत अडथळा आणत होती. त्याचबरोबर ही संधी हुकू द्यायची नव्हती. अप्रतिम शौर्य, सामरिक कौशल्य आणि उत्कृष्ट शौर्याचे दर्शन घडवत दोघेही जिप्सीतून बाहेर पडले, आणि फ़ाइरिंगकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्यांच्या दिशेने क्रवलिंग करत धाव घेतली. दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचलेल्या या दोघांनी स्वतःला सावरत आणि जीवाची पर्वा न करता जवळून गोळीबार केला, आणि दोन्ही दहशतवाद्यांचा जागीच खात्मा केला. ही कारवाई तब्बल १० तासांहून अधिक काळ चालली, आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एके ४७ रायफल, एक एके ५६ रायफल, दोन पिस्तूल, दोन इन्सास मॅगझिन, चार एके ४७ मॅगझिन, दोन पिस्तूल मॅगझिन आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दहशतवाद्यांनी आरआरचे दोन जवान हुतात्मा केले आणि एका नागरिकाला (बंधक) ठार केले. या कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) उपनिरीक्षक जय दवे, हेड कॉन्स्टेबल अवतार सिंग, कॉन्स्टेबल मुकेश कुमार, कॉन्स्टेबल गवई शेखर दादाराव यांनी उत्कृष्ट शौर्य, धाडस आणि उच्च दर्जाच्या कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले त्याबद्दल त्याना माननीय राष्ट्रपतींनी पोलीस शौर्य पदक प्रदान केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चे श्री गवई शेखर दादाराव, रा. मांडवा बु, पोस्ट. बटवाडी, ता. बाळापूर, जिला. अकोला यांना माननीय राष्ट्रपतीं द्वारे पोलीस शौर्य पदक प्रदान करने प्रशंसनीय आहे. सदरच्या शौर्य घटनेची दखल घेऊन अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र तर्फे श्री.शेखर गवई यांना सन्मानित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्या साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सदर वृत्तसेवा… सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर धुळे यांनी सा पोलीस व्हिजन धुळे यांना प्रसिद्धी साठी पाठवले असे.
