धुळे शहरात गिरासे कुटुंबाने केले एकत्र सुसाईड धुळे शहर हादरले

धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… धुळे शहरांमध्ये बऱ्याच दिवसापासून शांतता होती. या धुळ्यामध्ये एकाच कुटुंबाने सुसाईड करणे ही घटना कदाचित फार वर्षांपासून आत्ताच झालेली दिसून येते. नेमके हसता खेळता या परिवारावर कोणते मोठे टेन्शन होते?? एवढा मोठा शेवटच्या टोकाचा मृत्यूला कवटाळणे असा निर्णय घेणे म्हणजे मानव जेव्हा सर्व त्याची मानसिकता पूर्ण पणे जीवन जगण्यास निरर्थक ठरते अशा वेळेस हे शेवटचे पाऊल उचलत असतो. परंतु एकाच कुटुंबात पुन्हा एकाला टेन्शन असू शकते! पण त्यातून पत्नी व दोन्ही मुले यांनी देखील आपले जीवन संपवले याचा अर्थ काय लावावा? गिरासे परिवारामध्ये नेमके कोणत्या कलहातुन हा एवढा मोठा जिवन संपवण्याचा निर्णय घेतला?हे पोलीसांना देखील खूप विचार करणारा प्रश्न पडला आहे. पोलीस तपास विविध मार्गाने सुरू झाला आहे. पण संपूर्ण कुटुंब या जीवनातून निघून गेले आहे. घडलेली घटना अशी की,देवपूर मधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना तीन चार दिवसा आधीच घडलेली असावी, कारण बंद घरातुन दुर्गंधी पसरली तेव्हा हा उलगडा झाला.पोलीसांना परिसरातील नागरिकांनी सूचना दिल्यावर घर उघडवले गेले, तेव्हा एकाच वेळी चार मृतदेह घरातून मिळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.ही सामुहिक आत्महत्या की अन्य काही ? याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,देवपूरमधील प्रमोदनगर प्लॉट नं.८ बर राहणारे श्री प्रविण मानसिंग गिरासे,त्यांची पत्नी दिपा प्रविण गिरासे ही शिक्षिका आहे व मुले चि.मितेश आणि चि.सोहम अशा चार जणांचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आले.साधारण तीन ते चार दिवसापूर्वी ही घटना घडली असावी.कारण घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गेल्या चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते घरकामासाठी येणारी महिलाही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती दोन वेळा परत गेली.गॅस सिलेंडर
देणारा देखील परत गेला होता.आजुबाजूच्या लोकांना जेव्हा चार दिवसानंतरही घरातून मागमूस येत नसल्याचे लक्षात आल्याने काही जणांनी प्रविण गिरासे यांची बहीण संगिता योगेंद्रसिंग राजपूत यांना
माहिती दिली.बहीण संगिता यांनी आज सकाळी प्रविणचे घर गाठले आणि लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरातील एका रुममध्ये प्रविणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले.
हे दृष्य पाहून संगिता यांनी एकच हंबरडा फोडला.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रकाश पाटील,हवालदार संतोष हिरे,प्रकाश सोनार,निलेश
पोतदार,देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे
पीएसआय किरण कौतुळे,
हवालदार चंद्रकांत नागरे,
हावलदार सुनील राठोड तसेच
सामाजिक कार्यकर्ते
रावसाहेब गिरासे,माजी
नगरसेवक कमलेश देवरे,
माजी नगरसेवक भगवान
गवळी,प्रफुल्ल पाटील,
अमित दुसाने यांच्यासह
परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चारही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयाच्या
शवागारात हलविले.मयत प्रविण गिरासे हे मूळचे लोणखेडी
ता.जि.धुळे येथील रहिवासी होते.शहरातील पारोळारोडवरील ग.नं.६ च्या कॉर्नरवर असलेले कामधुने कृषि सेवा केंद्राचे ते संचालक होते.एका
सधन कुटुंबाशी संबंधीत असतांना या कुटुंबात घडलेली ही भयानक घटना धुळेकरांना सुन्न करणारी ठरली आहे.ही सामुहिक आत्महत्या की अन्य काही याबाबत पोलीस तपास करीत आहेत.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *