रस्ता वहिवाट वरून दोन शेतकऱ्यांच्या भानगडी अखेर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कायमचे मिटले वाद. अंतापुर, ता. २५: सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…अमरावतीपाडा (ता. बागलाण) येथील दोन शेतकऱ्यांचा वहिवाटी बाबत अनेक दिवसांपासून वाद होत होता व वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर वाद सामोपचाराने मिटविल्याने वादावर पडदा पडला आहे.सदर शेतकऱ्यांचा वाद बागलाणचे तहसीलदार कैलास चावडेयांच्याकडे ता.५ जुलै २०२४ रोजी दावा दाखल झाला होता.यात उत्तम शिवराम पानसरे हे वादी आणि काळू मधू गवळी आणि कारभारी निंबा कांदळकर हे प्रतिवादी होते.पहिली तारीख झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला तहसीलदार चावडे यांनी वादी प्रतिवादी या दोघांचे समुपदेशन करताना सांगितले की,वादविवाद ,कोर्टाच्या तारखा ,दाव्याचा खर्च यामुळे सदर रस्ता मोकळा करायला विलंब होणार आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांसह घरातील सदस्यांचा संबंध खराब होणार आहेत.शिवाय एकमेका शेजारी सातत्याने राहानारे बांधवांत वितूष्ट निर्माण होणार असल्याने आपण जर सामोपचाराने हा प्रश्न मिटवला तर खटला चालवायची गरज पडणार नाही असे तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना समजावले.यावेळी दोन्ही पक्षकार एकमेकाकडे वेगवेगळे स्वरूपाच्या अटीशर्ती टाकत होते.त्यात तहसीलदार चावडे यांनी स्वतः वेळ देऊन दोघांचे म्हणणे ऐकून दोघांची तडजोड घडवून आणली व एक शेतकरी याने दुसऱ्यासाठी काय करावे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्यासाठी काय करावे याबाबत दोघांमध्ये समेट घडवून देव मामलेदार यांच्या मूर्ती समोर शपथ घेऊन सदरचा वाद हा तडजोडीने मिटविण्यात आला.

यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला […]

बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू अतिरक्तस्राव मुळे. मुंबई:—(सा.पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो ) बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करत पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले असून शवविच्छेदन अहवालामध्ये याचा खुलासा झाला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलीसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव […]

धुळे शहरात गिरासे कुटुंबाने केले एकत्र सुसाईड धुळे शहर हादरले

धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… धुळे शहरांमध्ये बऱ्याच दिवसापासून शांतता होती. या धुळ्यामध्ये […]