कळंबेश्वर पोस्ट निंबी (मालोकार) ता. जि.अकोला येथील कष्टकरी शेतकरी परिवारातील आणि “केन्द्रीय रिजर्व पोलीस बलाचे” जवान श्री. किशोर गणेश अडागळे हे सध्या देशाच्या सुरक्षेत कर्तव्यासाठी छत्तीसगड तेलंगणा सिमावर्ती येथे कर्तव्यावर आहेत. त्यांनी नक्षल प्रभावित एरियात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान पुर्वक “पोलीस पदक” प्रदान करण्यात आले, आणि अजून दोन “सन्मान” प्रस्तावित असून ते पुरस्कार देखील दि.२६ जानेवारी २०२५ रोजी बहाल होणार आहे. त्याबद्दल अर्ध सैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल सुरेश कोरवी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवानिवृत्त उपनिरिक्षक श्री. संदीप कडूस्कर
यांनी गुरूवार दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशस्तीपत्र देवून श्री. किशोर गणेश अडागळे यांचा सन्मान केला.
