शाकुंतल सदग्रंथ वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार

शाकुंतल सदग्रंथ वाचनालय खर्दे बु ता. शिंदखेडा या वाचनालयाव्दारे दि. १४/८/२०२४ रोजी संध्याकाळी खर्दे बु. येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. खर्दे बु. येथे शिकत असलेली कु विद्या नंदलाल पाटील ही एम पी एस सी परिक्षा उत्तीर्ण होऊन पी एस आय पदावर आरुढ होणार आहे. वाचनालयातर्फे विद्या पाटील हिचा सत्कार कु दिव्या पाटीत हिने केला होता. या आनंदमय क्षणी गावातील महिला पुरुषांनीही सत्कार केला होता. कु विद्या पाटील ही लहानपणापासून आजोबांकडे राहत होती. आजोबांचे घर वाचनालयाच्या समोरच असल्यामुळे तिला वाचनाची गोडी लागलेली होती. विविध गोष्टीचे पुस्तकापासुन वाचनाचा छंद जडला होता. पदवी प्राप्तीनंतर स्पर्धा परिक्षेचे वेध लागले होते. जिज्ञासू वाचक रूपाने सामान्यज्ञानाचे विविध पुस्तके चाळू लागली. मोबाइलपासुन दूर राहून अभ्यासात अथक परिश्रम घेतले. आणि तिला नाविण्यपूर्ण यश मिळाले. विशेष म्हणजे ती एका मराठी शाळेतून शिक्षण घेऊन यशस्वी झालेली आहे. ती एका शेतकरी कुटुंबातील असुन तिचे मुळ गाव परसोळे आहे. तिने आपल्या आई वडीलांचे व आजोबा श्री. साहेबराव पवार याचे स्वप्न साकार केले आहे. कु विद्या पाटील हिने गावातील तरुण तरुणींना उ‌द्बबोधन केले की, आपण आपले ध्येय निश्चित केले की हमखास यश मिळते. त्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यापूर्वी खर्दे बु.येथील रहिवासी श्री गोपाल पाटील यांनीही वाचनालयाच्या लाभ घेतला होता. यांनाही स्पर्धा परिक्षेत यश मिळालेले आहे यांची हायकोर्ट मुंबई येथुन निवड झाली होती. तसेच श्री. ईश्वर हिलाल ढिवरे हे जिल्हा परिषद मराठी शाळा अंजनविहीरे येथे कार्यरत उपशिक्षक आहेत यांनी जेव्हा वाचनालयास प्रथम भेट दिली तेव्हा यांना प्रचंड आनंद आला होता. मौलिक ग्रंथ संपदा पाहून ग्रंथालयाचे प्रमुख श्री सुरेश मोरे यांचे धन्यवाद व्यक्त केले होते.श्री. ईश्वर ढिवरे हे ग्रंथालयाचे जिज्ञासू वाचक आहेत. हे कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे संशोधक विद्यार्थी म्हणून अभ्यास करीत आहेत. यांच्या संशोधक अभ्यासासाठी असलेल्या विषयासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून वाचनालयातील ग्रंथाचा लाभ घेत आहेत. खर्दे बु. या गावातील अजून अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करीत आहेत. यातील प्रामुख्याने कु. वर्षा सदाशिव वेडसे, कु दिपाली राजेंद्र भामरे आणि कु. दिव्या कैलास मोरे हे ग्रंथालयातील ग्रंथांचा लाभ घेत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे कु दिपाली राजेंद्र भामरे ही सुध्दा स्पर्धा परिक्षेत यशस्वीतेच्या मार्गावर आहे. हिची अभ्यासाची जिद आणि चिकाटी खुप आहे. कु. दिपाली भामरे हीं गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे.

यशस्वी झालेल्या कु विद्या पाटील यांचे श्री. सुरेश मोरे यांनी तोंडभरुन कौतुक केले व परिसरातील जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षा देत असतील त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरीत करावे अशी विनंती केली आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. प्रणव मोरे यांनी परिश्रम घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *