
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधन साजराभडगाव (जावेद शेख)कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. कार्डशिट पेपर,चहाचे कप,दोरा,रंगीत मनी इत्यादी साहित्याचा उपयोग करून शाळेच्या मुलींनी स्वतः राख्या बनवल्या. मुलांनीही बहिणींना पेन, पेन्सिल,चॉकलेट अशा भेट वस्तू दिल्या. पारंपारिक पद्धतीने अत्यंत भावनिक वातावरणात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. फलक लेखन श्री अनंत हिरे सर यांनी केले. श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी रक्षाबंधन निमित्त सुरेख असे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सदैव बहिण भावाच्या पवित्र नात्याचे पालन करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, अनिता सैंदाणे,श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे,अनंत हिरे, सुयोग पाटील,सचिन पाटील, हरिचंद्र पाटील,किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
