शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षिका रंगेहात लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात अखेर अडकली धुळे (क्राईम न्यूज ब्युरो.सा.पोलीस व्हिजन… गोपाल म्यांद्रे) : शासकीय अधिकारी हे काही खूप प्रामाणिक असतात पण काही ठराविक भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुळे ते कार्यालय बदनाम होते.त्यातल्या त्यात धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय हे जिल्हा परिषद अंतर्गत धुळे जिल्ह्यातील सतत बरबटलेल्या नावाने नावाजलेले कार्यालय म्हटले जाते. येथे अनेक शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकुन तुरुंगात गेले आणि बाहेर आले.हे कार्यालय वास्तविक धुळे जिल्हा कारागृह च्या अगदी भिंतीला भिंत लागून आहे. म्हणून तुरुंगाची भीती यांच्या मनात कदाचित नसावी.या इमारतीत येथे पूर्वी इंग्रज कालीन घोडे बांधण्याचे ठिकाण म्हणून या इमारतीला महत्त्व होते. मात्र याच घोडेबाजारात अनेक पवित्र शिक्षण क्षेत्रातील काम करणारे शिक्षक वर्ग यांचे शोषण याच कार्यालयात काही कथीत महाभाग पैशांची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणतीही फाईल सरकु देत नाहीत. शिक्षकांचे शोषण करण्यामध्ये येथील काही महाभाग त्यांच्या ठरलेल्या दलालांच्या मार्फत चिरीमिरीची कामे करत असतात. यात काही बांड्या पुढारींचा देखील समावेश आहे. या बांड्या पुढारींनी सुपार्‍या घ्याव्यात आणि इथे ठराविक टेबलवर लाच देऊन कामे उरकून घ्यावीत असा हा प्रकार फार वर्षापासून सुरू होता अशी देखील चर्चा आहे. अनेकांची लाडकी बहीण होती म्हणे.मात्र काही शिक्षक त्रस्त झाले होते. जाळ्यात मोठा मासा कधी अडकेल!! याची सर्वजण आतुरतेने वाटत पाहत होती. आणि ते आज घडले. एकच जल्लोष झाला. काही पीडित शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर मोठी फटाक्यांची लढ देखील फोडण्याची चर्चा सुरू आहे.म्हणतात ना असत्य कधीही सत्य होत नसते. असत्याला शेवटी जेल मध्येच जावे लागते. घडलेली घटना अशी धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.धुळे महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता घेणे बाकी तो मंजुरीसाठी हे दाम्पत्य वारंवार या कार्यालयाच्या खेट्या घालत होते. ते काढून देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस तपासामध्ये सर्व पुढील यात कोण कोण सामील आहे हे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *