नाशिक क्राईम न्यूज ब्युरो… वैभव देवरे….सा पोलीस व्हिजन धुळे……
नाशिक….. नासिक येथील अंबड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले डॅशिंग प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला करण्याची घटना घडली आहे. सदर घटना अशी की,सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात वाद सुरू होता. याची खबर अंबड पोलिसांना मिळाल्यावर तेथे पोलीस पथक आले.सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच मात्र हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पवार हे डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते धुळे जिल्ह्यातील भांडणे साक्री पांझरा कान साखर कारखाना येथे बालपणापासून त्यांचे संपूर्ण शिक्षण तिथे झाले अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी उच्च शिक्षणातून प्रथम शैक्षणिक संकुलामध्ये प्राध्यापकाची नोकरी बजावली. पुढे उच्च परीक्षा देत पोलीस खात्यामध्ये नोकरी त्यांना मिळाली. आणि आज ते नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मात्र हा वाद सोडण्याच्या साठी त्यांनी प्रयत्न करत असताना त्यांच्यावर चाकू हल्लाकरण्यात आला ,तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सातपेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडे मळा येथे दोन गटात बांधकामावरून वादावादी सुरु असल्याची माहिती उपनिरीक्षक सविता उंडे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ प्र.पोलीस निरीक्षकांना कळवत नियंत्रण कक्षातील राखीव पोलीस घेऊन घटनास्थळ गाठले. बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकाचे नातलग यांच्यात वाद सुरु होता. बांधकाम व्यवसायिक माणिक सोनवणे यांचा जागेच्या मालकी हक्कावरुन गाडे यांच्याशी वाद असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाच्या आदेशाने मनपा प्रशासनाच्या वतीने पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. मालक सचिन जानी आणि महानगर पालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे कर्मचाऱ्यांना घेऊन आले. त्यावेळी तेथे उपस्थित बेबी गाडे यांनी महापालिका अधिकारी आणि इतरांना काम करण्यास विरोध केला. मजूर गाळा उघडण्याचा प्रयत्न करत असताना बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे या संशयितांनी मजुरांना मारहाण केली. यावेळी उपनिरीक्षक उंडे यांच्यासमवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे अन्य सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपस्थित जमावाला समजावत असताना त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. संशयित सुजाता उर्फ बेबी गाडे हिने उपनिरीक्षक उंडे यांच्या हाताला नखाने ओरबाडून जखमी केले. त्यांना मारहाण केली. अश्विनी पवार यांच्या हातालाही नखाने ओरबाडले. भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांनीही पवार यांना मारहाण केली. याविषयी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली. संबंधित ठिकाणी १०० हून अधिक लोक जमा होते. त्यामुळे स्वत: जादा कुमक घेऊन गेलो. महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. आपल्यावर चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून सायंकाळी उशीरा पर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे….
