१४ हजार फुट उंची, ५ डिग्री तापमानातही पोस्ट सांभाळून पाकिस्तानी अतिरेक्यांचा केला खात्मा

सा.पोलीस व्हिजन धुळे
धुळे… अभय माध्यमिक विद्यालय धुळे येथील माजी विद्यार्थी प्रवीण झोळेकर हा धुळे येथील आहे. तो आज भारतीय सेनेमध्ये आपली नोकरी बजावत आहे हा सार्थ अभिमान आहे…अगदी रक्त गोठवणारी ५ डिग्रीवर गेलेली थंडी, बाहेर पाकिस्तानी अतिरेकी- घुसपोरांकडून ४ हजार फुट उंचावरुन सतत बॉम्ब फेक सुरू होती. अशा प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत कारगील जवळील काकसर सेक्टरमधील चौटी पोस्ट आम्ही १९ जणांनी तब्बल ६४ दिवस चिवट झुंज देत टिकवून ठेवली. शिवाय बजरंग पोस्टवरील अतिरेक्यांचा सफाईदारपणे खात्मा केला; परंतु डोळया देखत दोन सहकाऱ्यांना वीर मरण आले. चौकी काबीज करुन पुन्हा तिरंगा फडकावयाचाच ही उमेद बर्फाळ थंडीतही ऊर्जा देत होती. कारगील युध्दात तब्बल १४ हजार फुटांवरुन अतिरेक्यांचा सामाना करणारे बीएसएफचे जवान प्रवीण झोळेकर आपला अनुभव सांगत होते…
६४ दिवसांची झुंज
चोटी पोस्टवरुन १५ मे ते १८ जुलै पर्यंत सलग ६४ दिवस चिवट झुंज दिली. शिवाय शत्रूला नामोहरम करून सोडले. भारतीय सैन्याचा विजय झाल्यावर त्या दिवशी रात्रभर सैन्याचा जल्लोष सुरू होता, युध्दाच्या काळात कुटुंबियांशी फारसा संपर्क नव्हता. युद्धानंतर कारगील विजेता म्हटल्यावर आजही छाती अभिमानाने फुलते. असे जवान झोळेकर सांगतात.
अंगावर शहारा अन् देशभक्तीने फुलणारी छातीबाबत शहरातील रहिवाशी तथा बीएसएफ जवान प्रवीण शांताराम झोळेकर आपला अनुभव सांगताना म्हणाले, मे १९९८ मध्ये काकसर सेक्टरमध्ये बदली इझाली. तर १९९९ ला त्यावर्षी सर्वत्र बफाळ वृष्टी झाली होती. त्यामुळे सैनिक व बीएसएफची आमची तुकडी सुमारे १८ हजार फुटांच्या चौकीवर खाली उतरले होते. तर
शिवचरित्रातून प्रेरणा
९ मे १९९८ रोजी काकसर सेक्टरला बदली झाली होती. त्यावेळी जाताना सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक सोचत नेले होते. छत्रपती शिवराः युद्धनीती-गनिमी कावा अन प्रसंगी ठेवलेला संयम साहस कारगील युद्धाच्या वेळी आपसूकच आठवायचा. शिवाय शिव चरित्रातून शत्रूला नामोहरम करण्याची ऊर्जा मिळायची. असा अनुभव ते आवर्जुन सांगतात.
१९ जवानांचा समावेश असलेली आमची बीएसएफची एक सेक्शन अर्थात तुकडी बजरंग चौकीपासून ४ हजार फुट खाली चोटी पोस्टवर थांबली होती. मे महिन्यांत बर्फ वितळण्यास सुरुवात झाली होती. सुभेदार हवासिंग आमचे प्रमुख होते. याच काळात पाकिस्तानी घुसखोरांनी बजरंग चौकीवर ताथा मिळवला. तर भारतीय लष्कर चोटी पोस्टपासून सुमारे १४ हजार फुट
खाली व काही कि.मी. अंतरावर मागे होती. चोटी पोस्ट टिकवून ठेवण्यासोबत बजरंग चौकी पुन्हा मिळवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. या ठिकाणी ८५ एम.एम. मॉर्टर या उखळी तोफच्या माध्यमातून तीन बंकरमधून आम्ही रात्रंदिवस अतिरेक्यांच्या बॉम्ब हल्लाला प्रतिउत्तर देत होतो. त्यामुळेच ४ हजार फुट उंचीवर असूनही पाकिस्तानी सैनिक-अतिरेक्यांना चौकी ताब्यात घेता आली नाही. खालून येणाऱ्या घोडघांवरुन रसद अन् दारुगोळा पुरवला जात होता. याच बळावर अतिरेक्यांनी काबिज केलेले अनेक बंकर उद्ध्वस्त केले. परंतु १६ जून रोजी दुपारी सव्वा बारा वाजता अतिरेक्यांनी हल्ला करुन आमची एक तोफ नष्ट केली. मात्र दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा निर्धार जीवावर उदार होऊन केला होता. त्यामुळे शत्रूला अन्य चौकी व पोस्ट काबीज करता आले नाही. सध्या जवान झोळेकर राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे कार्यरत आहे.
कारगिल विजय दिवस जय हिंद…..सा पोलीस व्हिजन धुळे वतीने वर्दीला सलाम सा पोलीस व्हिजन धुळे