वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
सध्या राज्यात सांप्रदायिक, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. नाशिक येथील पंचवटी काळाराम मंदिराच्या परिसरात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली. तसेच आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावतील असे पत्रके देखील वाटण्यात आले. सदरच्या घटनेमुळे राज्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना संताप जनक आणि तीव्र आहेत. धुळ्यात देखील याबाबत पडसाद उमटले. शहरातील “संविधान संरक्षण समितीच्या” वतीने राज्याचे गृहमंत्री यांना धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की दि.२१ जुन रोजी मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके छापून परिसरात टाकण्यात आली. सदरचे पत्रके सध्या सोशल माध्यमांवर देखील व्हायरल होत आहे. सदरच्या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हात जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतूने पत्रके छापण्यात आलेली आहेत. म्हणूनच राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनेचे मुख्य सूत्रधार गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी, व देशद्रोहाचे कलम लावून आरोपी अंडरट्रायल ठेवणे, सदर केस चा निकाल लागेपर्यंत घटनेच्या आरोपींना एम. सी. आर. मध्ये ठेवण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन राज्याचे गृहमंत्री यांना “संविधान संरक्षण समितीच्या” वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संविधान संरक्षण समितीचे प्रमुख श्री हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर दादा खंडारे, एल. आर. राव, पापालाल पवार, बी. यु. वाघ, जी. डी. जाधव, बबन वानखेडे, किशोर खैरनार, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड दीपक सोनवणे, कॉम्रेड वसंत पाटील, कार्तिका ताई बेडसे, निंबा तात्या नेरकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
