प्रेमाची सुरुवात कशी झाली?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावात राहणाऱ्या नेमी देवीच लग्न 15 वर्षापूर्वी झिनझिनियालीच्या नारणा राम भील सोबत झालं होतं. नेमी देवी कधी शाळेत गेली नाही. ती 32 वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर ती डान्सचे रील पोस्ट करायची. तिचे 40 हजार फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमाराम बरोबर झाली. संपर्कात आल्यानंतर दोघे बोलू लागले. हळूहळू दोघे परस्परात गुंतत गेले. दोघांमध्ये अफेअर सुरु झालं.
पोलिसांनी या प्रकरणात काय केलं?
नेमी देवीने सांगितलं की, “तिला 5 मुलं आहेत. नवरा तिला मारहाण करायचा. तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे ती कंटाळलेली” या दरम्यान इन्स्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमराम बरोबर झाली. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता तिला लग्न करुन प्रियकरासोबत रहायचय. पोलिसांनी दोघांची जबानी नोंदवून त्यांना जाऊ दिलं.
