नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मध्यस्थीने शिक्षकांच्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून चर्चा

■ जूनी पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेंनंतर मार्गी लावणार
■ येणाऱ्या अधिवेशनात टप्पावाढीचा निर्णय घेणार
■ आश्रम शाळेच्या वेळेत बदल करणार
■ आश्रम शाळांसाठी ४४०० वरून ४८०० ग्रेडपेला मान्यता
■ माध्यमिकप्रमाणे आदिवाशी विभागाचे पगार १ तारखेलाच होणार
■ शिक्षकांचे मेडिकल बिले कॅशलेस करणार
मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आमदार किशोर दराडे यांच्यासोबतच्या बैठकीत ठोस निर्णय

🔰
नाशिक विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या पुढाकारातून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक सर्व संघटना प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून अनेक प्रश्नांना चालना मिळाली आहे.
शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर,कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा.गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा.उदयजी सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे तसेच मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारी २.१५ ते ४.१५ या प्रदीर्घ वेळेत मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. २००५ पूर्वी नियुक्त पण २००५ नंतर १०० झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन लागू करण्यास मा. शिंदे साहेब पूर्णपणे सकारत्मक असून आचारसंहिता संपताच काही दिवसात हा प्रश्न निकाली लागणार आहे.यासाठी शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे ठोस आश्वासन शिंदे साहेबांनी दिले.तसेच २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्यासाठी कमिटी स्थापन करून त्यावर शासन निर्णय घेईल असेही शिंदे साहेबांनी आश्वासित केले.
२० व ४० टक्के घेणाऱ्या माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसाठी टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीने नियमित पणे देण्याचे मान्य केले असून येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेण्यात चे आश्वासन देण्यात आले.
आदिवाशी आश्रम शाळेचे पगार नियमित करण्यात येतील अशा सूचना देऊन त्यांची वेळ येत्या जूनपासून ११ ते ५ अशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री महोदयांनी केली. विनाअनुदानितवरुन अनुदानितवर बदली, मान्यता आणि शालर्थ आयडी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाचे म्हणजे,आश्रमशाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगानुसार ४४०० वरुन ४८०० वर करण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक आजच निर्गमित करण्यात आले.
सर्वअनुदानित शाळा व आश्रम शाळाना कला व क्रीड़ा शिक्षकांची पदे भरण्यास त्वरित मान्य केले.नाशिक जिल्ह्यासह विभागातील १०४३ शिक्षकांची रखडलेली फरक बिले त्वरित काढावेत असा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.सातव्या वेतन आयोगानुसार वेतनेत्तर अनुदान देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असून यावरही कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीला यावेळी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष शिक्षक नेते आप्पासाहेब संभाजी पाटील जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे टीडीएफचे नाशिक विभाग कोषाध्यक्ष मोहन चकोर,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख,शिक्षक संघटना नेते डॉ. सुधीर जाधव,,जुनी पेंशन योजनेचे नेते दिगंबर नारायणे,अशोक सोमवंशी, अमरावती विभागाच्या संगीताताई शिंदे,महेंद्र हिंगे,उपाध्यक्ष प्रदीप सांगळे,अनिल परदेशी, बी.के.नागरे,दिनेश देवरे,माधुरी मेटेंगे,बंडू मखरे,सुदर्शनाताई त्रिगुणाईत तसेच नाशिक,नगर,जळगाव,धुळे, नंदुरबार आदी नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात यावेळी बैठकीला मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

°•~━━✥बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे✥━━~•°

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *