आम्ही धुळेकर संघटनेचे धुळे शहर सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन, लेनिन चौक ते स्टेशन चौक रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा जहाल आंदोलनाचा ईशारा.

वृत्त प्रतिनिधी- सा पोलीस व्हिजन धुळे…. धनंजय गाळणकर, धुळे
शहरातील स्टेशन रस्ता, लेनिन चौक ते रेल्वे स्टेशन चौक या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.त्याबाबत आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने शहर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी उपअभियंता श्री. पाटील यांना दि.३ जुन २०२४ रोजी निवेदन देण्यात आले. शहर बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शिवतीर्थ ते दसेरा मैदान या रस्त्यावर लेनिन चौक ते स्टेशन चौक या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. तसेच धुळे टेक्स्टाईल मिलच्या गेटच्या समोर जल वाहीनी दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी ते खड्डे न बुजवल्यामुळे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. सदर रस्त्यावर अवजड वाहने दररोज येजा करत असतात. तसेच परिसरात शाळा, महाविद्यालय तसेच अनेक प्रकारचे हॉस्पिटल असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. व सदर नमूद खड्ड्यांमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरी सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत. तसेच सदर रस्ता लवकर दुरुस्त न केल्यास आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू. व सदर आंदोलन प्रसंगी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण व आपले डिपार्टमेंट जबाबदार राहील. असे आम्ही आपणास निवेदन देत आहोत. तरी सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी. असे आम्ही आपणास निवेदन देत आहोत. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आम्ही धुळेकर संघटना प्रमुख धनंजय गाळणकर, संविधान संरक्षण समितीचे संस्थापक श्री. हरिश्चंद्र लोंढे, भगवान वाघ, छोटूलाल मोरे, रमेश शिरसाट, चेतन बाविस्कर, नारायण पाटील आदी निवेदन देताना उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *