धुळे पोलीसांनी मोटार सायकल चोरट्यास पकडले धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…. धुळे येथे वाहनाच्या व मोबाईलच्या वाढत्या चोरीमुळे जनता परेशान झाली पोलिसांकडे तक्रारी वाढल्या आहेत. साखरी सुरत बायपास वरील धुळे येथील शासकीय जिल्हा रूग्णालय परिसरातून दुचाकी लंपास करणार्‍या मालेगावच्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याने या चोरलेल्या मोटरसायकली लपवून ठेवल्या नेमक्या त्याने या मोटरसायकली कुठे लपवल्या आहेत याचा खाकी दंडुका दाखवल्यावर पोलिसांना त्याने मोटरसायकली लळींग कुरणात लपवून ठेवलेल्या आहेत असे सांगितले.त्या ५ दुचाकी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या.शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने बसस्थानक परिसरातून निसार शहा पिरन शहा (रा.मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने धुळ्यासह नाशिक जिल्ह्यातून देखील दुचाकी लंपास केल्या होत्या. तसेच या दुचाकी धुळे शहरानजीक असलेल्या लळींग कुरणात लपवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याकडून ८५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडून शहर पोलिसात दाखल दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचीही उकल झाली आहे. पोलिसांनी आपली ही कारवाई अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक श्रीराम पवार, पोसई योगेश राऊत, अमरजित मोर, रविंद्र बागुल, असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना रविकिरण राठोड, पोकॉ सुशिल शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, सागर शिर्के यांच्या पथकाने केली. या कारवाईने धुळे पोलिसांचे जनतेकडून कौतुक होत आहे. अनेक दिवसांपासून चोरीला गेलेले मोबाईल देखील अशाच पद्धतीने लवकर मिळावेत असे पोलिसांना आवाहन करण्यात आले आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळा, “संविधान संरक्षण समितीचे” राज्याच्या गृहमंत्र्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन.

वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरसध्या राज्यात सांप्रदायिक, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. […]

युतीस पळविल्याने तरुणाविरूध्द पोलीसांनी केला गुन्हा दाखल

शहादा.(नंदुरबार प्रतिनिधी)-सध्या मोबाईल मुळे अनेक प्रकारचे कुटुंब उध्वस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. आई वडील तरुण […]

गावात रील बनवता, बनवता, 40 हजार फॉलोअर्स बनले, 5 मुलांची आई एक दिवस युजरच्या प्रेमात पडली आणि मग….Police Vision News: महिला इन्स्टाग्रामवर रील बनवून पोस्ट करायची. आपल्या आयुष्यात असं काही घडेल याची तिला कल्पनाही नव्हती. नेमकं या प्रेम प्रकरणाची सुरुवात कशी झाली? महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिने तिथे काय सांगितलं?तुम्ही पाकिस्तानच्या सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीणाच्या लव्ह स्टोरीबद्दल ऐकलं असेल. आता अशीच एक लव्ह स्टोरी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये समोर आलीय. इथे महिला आणि तिच्या प्रियकराने देशाची सीमा ओलांडली नाही, पण प्रेमाची सीमा नक्कीच ओलांडली. महिलेचे एक युवकासोबत ऑनलाइन प्रेमसंबंध जुळले. ती युवकाच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिने आपली 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून दिलं. गुजरातला जाऊन ती प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. हे प्रकरण पोलीसात गेलं, तेव्हा महिलेने प्रियकरासोबतच रहायच आहे, असं सांगितलं. ती नवऱ्याला कंटाळली होती.एका दूरच्या खेडेगावात राहणारी ही 32 वर्षांची महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळू हळू तिची रील पाहून हजारो फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत महिलेची मैत्री झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. महिलेच्या पदरात पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाच्या प्रेमात महिला पार बुडून गेली होती. तिने नवरा आणि मुलांना सोडलं.

प्रेमाची सुरुवात कशी झाली?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावात राहणाऱ्या नेमी देवीच लग्न 15 वर्षापूर्वी […]

नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मध्यस्थीने शिक्षकांच्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून चर्चा

■ जूनी पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेंनंतर मार्गी लावणार■ येणाऱ्या अधिवेशनात टप्पावाढीचा निर्णय घेणार■ आश्रम शाळेच्या […]

आम्ही धुळेकर संघटनेचे धुळे शहर सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन, लेनिन चौक ते स्टेशन चौक रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा जहाल आंदोलनाचा ईशारा.

वृत्त प्रतिनिधी- सा पोलीस व्हिजन धुळे…. धनंजय गाळणकर, धुळे शहरातील स्टेशन रस्ता, लेनिन चौक ते […]